

Layoffs 2023 : २०२२ सालचे पहिले काही महिने कोरोनाच्या भीतीने घालवले. अशा परिस्थितीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. गेल्या वर्षभरात Amazon, Netflix आणि Facebook सारख्या मोठ्या कंपन्यांनी नोकऱ्यांमध्ये मोठी कपात केली होती. काही कंपन्यांनी नोकऱ्यांमध्ये छाटणीसाठी कोरोनाव्हायरसचा हवाला दिला, तर काहींनी जास्त कामावर घेण्याबद्दल सांगितले. तज्ज्ञांच्या मते, २०२३ मध्ये मागील वर्षांच्या तुलनेत नोकऱ्यांना अधिक धोका आहे. विविध कंपन्यांमधील टाळेबंदीवर लक्ष ठेवणाऱ्या एका वेबसाइटने (https://layoffs.fyi/) गेल्या काही वर्षांची आकडेवारी सादर केली आहे जी अतिशय भयावह आहे.
२०२२ मध्ये लाखो नोकऱ्यांना ग्रहण
layoffs.fyi वेबसाइटनुसार, गेल्या वर्षी २०२२ मध्ये १,५३,००० हून अधिक नोकऱ्या संपुष्टात आल्या. हा आकडा फक्त टेक कंपन्यांचा आहे. तर २०२१ मध्ये १५,००० कपात दिसली आणि २०२० मध्ये हा आकडा ८०,००० च्या आसपास होता. तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी २०२३ मध्ये अधिक टाळेबंदी दिसून येईल. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर गूगल या महिन्यात हजारो लोकांच्या नोकऱ्याही काढून टाकू शकते. असे म्हटले जात आहे की गूगल रिव्ह्यू अँड डेव्हलपमेंट (GRAD) नावाच्या कामगिरी रेटिंग प्रणालीच्या आधारे आपल्या कर्मचार्यांना रेटिंग देत आहे आणि त्यानंतर हजारो लोकांना कंपनीतून काढून टाकले जाऊ शकते. अॅमेझॉनबाबत तज्ज्ञांचेही असेच मत आहे की, या वर्षीच्या जानेवारीत अॅमेझॉन अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
#Layoffs Early January 2023 Spike pic.twitter.com/KIMUOUCwQf
— Joseph Angelo (@Beachdudeca) January 5, 2023
हेही वाचा – Covid 19 : देशात लॉकडाऊन? १५ दिवस बंद राहणार शाळा आणि ऑफिस? वाचा खरं!
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांनीही टाळेबंदीकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, जानेवारीच्या पहिल्या सहामाहीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट दिसून येईल. यूएस मधील ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की जानेवारीमध्ये अनेकदा टाळेबंदी दिसून येईल.