Laapataa Ladies Oscars 2025 : किरण राव यांचा चित्रपट ‘लापता लेडीज’ ऑस्कर 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय फिल्म फेडरेशनने सोमवारी याची घोषणा केली. ‘लापता लेडीज’ फॉरेन कॅटेगरी पुरस्कारासाठी पाठवला जाईल. हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस ‘आमिर खान प्रॉडक्शन’च्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे.
‘लापता लेडीज’ यावर्षी 1 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यापूर्वी हा चित्रपट 8 सप्टेंबर रोजी 48व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता. प्रदर्शनादरम्यान या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली.
India's Official Entry for the 2024-25 Oscars for Best Foreign Language Film Category at the 97th Academy Awards (Oscars 2025) is #LaapataaLadies (Hindi) pic.twitter.com/MmB4LctXEp
— Ramesh Bala (@rameshlaus) September 23, 2024
हेही वाचा – या गावात प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे विमान, घराबाहेर विमानांसाठी पार्किंग, पाहा Video
गेल्या आठवड्यात किरण राव यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की ऑस्कर 2025 साठी त्यांच्या चित्रपटाची निवड व्हावी हे त्यांचे स्वप्न आहे. ‘स्त्री 2’, ‘मुंज्या’, ‘महाराज’, ‘भक्षक’ आणि ‘क्रू’ यांसारख्या चित्रपटांच्या नावांचाही ऑस्कर 2025 साठी विचार केला जात होता. मात्र, या चित्रपटांना भारताकडून ऑफिशियल एंट्री मिळणार नाही.
17 जानेवारी 2025 रोजी 97 व्या ऑस्करसाठी नामांकने जाहीर केली जातील. ऑस्कर 2025 च्या विजेत्यांची नावे रविवार, 2 मार्च 2025 रोजी जाहीर केली जातील. ऑस्कर 2025 शो संध्याकाळी 7 वाजता (EST) सुरू होईल. एबीसीपुरस्कार कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करेल. भारताबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही हा कार्यक्रम 3 मार्च रोजी पहाटे 4 ते 4:30 या वेळेत थेट पाहू शकाल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!