

Krushna Abhishek quits The Kapil Sharma Show : द कपिल शर्मा शोमध्ये कृष्णा अभिषेक न येण्यामागचं कारण अखेर समोर आले आहे. द कपिल शर्मा शो सप्टेंबरपासून तुमच्या टीव्ही स्क्रीनवर परतणार असल्याच्या बातम्या आहेत. चाहत्यांना पुन्हा हास्याचा डबल डोस मिळेल. पण त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये काहीशी निराशाही झाली. कारण या शोमध्ये कृष्णा अभिषेक दिसणार नाहीये. अनेक अटकळ बांधल्या जात होत्या, पण शेवटी कृष्णानंच तो या शोच्या आगामी सीझनचा भाग का नाही याचं रहस्य उघड केलं आहे.
सपनाचे पार्लर शोमध्ये नसणार..
सपनाच्या व्यक्तिरेखेवरून कृष्णा हा घराघरात प्रसिद्ध झाला. साहजिकच शोमधील प्रत्येकजण सपनाच्या पात्राला खूप मिस करणार आहे. कृष्णा अभिषेक त्याच्या कॉमिक टायमिंगनं शोला एक वेगळेच रूप देत असे. सपनाच्या व्यक्तिरेखेनं त्याला एक वेगळी ओळख दिली आहे, असं खुद्द कृष्णाचंही मत आहे. कृष्णानं सांगितलं, की कॉन्ट्रॅक्टच्या समस्येमुळं त्याला शोमधून बाहेर पडावं लागलं.
हेही वाचा – “मला तुझी जर्सी दे”, चाहत्याची मागणी ऐकताच शिखर धवननं काय केलं बघा; तुम्हीही हसाल!
शोच्या एका जवळच्या सहकाऱ्याने सांगितलं, की “शोच्या निर्मात्यांनी आणि कृष्णानं गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी खूप प्रयत्न केले. सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची फी. शोचे निर्माते आणि त्यांच्यामध्ये पैशाची समस्या होती. त्यामुळे त्याला शोमधून बाहेर व्हावं लागलं. आम्ही अजूनही प्रार्थना करत आहोत की ही समस्या दूर होईल आणि कृष्णा शोमध्ये परत येईल. पण आता यापुढे काही सांगता येणार नाही.”
कृष्णा आणि कपिलमध्ये मतभेद?
दरम्यान, कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा यांच्यातील मतभेद हे शो सोडण्याचे कारण असल्याची अफवा पसरली होती. यावर सूत्रानं सांगितलं की, “हे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे. आर्थिक फरकामुळे कृष्णा हा शो करू शकत नाही. कपिल या शोचा निर्माता नाही. त्याची स्वतःची एक निश्चित फी देखील आहे. त्याच्या आणि कृष्णा यांच्यातील मतभेदांची चर्चा पूर्णपणे निराधार आहे. हे सर्व पैशाबद्दल आहे. कपिल आणि कृष्णा एकमेकांचा खूप आदर करतात.”
हेही वाचा – घरात इलेक्ट्रिक जीप बनवणाऱ्या तरुणाची लॉटरी! आनंद महिंद्रांनी दिली ‘ही’ गोष्ट; पाहा VIDEO!
शोच्या तारखेबाबत अद्याप निर्माते किंवा कपिल शर्माकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार, हा शो सप्टेंबरपर्यंत सुरू होऊ शकतो. शोच्या कलाकारांमध्ये कपिल शर्मासोबत सुदेश लाहिरी, चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्ती दिसणार आहेत. कपिलचा एक चित्रपटही येत आहे ज्यासाठी त्याने वजनही कमी केलं आहे. शो बंद झाल्यानंतर संपूर्ण टीम कपिल शर्मासोबत वर्ल्ड टूरवर होती. टीमने अमेरिका आणि कॅनडामध्ये शो देखील केले, जे खूप हिट ठरले. नुकतीच बातमी आली होती की या शोसाठी नवीन कलाकारांचाही शोध घेतला जात आहे.