Kotak Mahindra Bank : खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या कर्जाच्या दरात म्हणजेच MCLR मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. MCLR वाढल्यानंतर गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज यासारखी सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांमुळे महागाई नियंत्रणात येत आहे, मात्र एकापाठोपाठ एक रेपो रेट वाढवण्याच्या निर्णयाचा फटका कर्जदारांना बसत आहे.
कोटक महिंद्रा बँकेने वेगवेगळ्या कर्ज विभागांसाठी MCLR वेगवेगळ्या कालावधीसाठी १० ते ३० बेस पॉईंट्सने वाढवला आहे. बँकेच्या घोषणेनंतर वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जावरील व्याजदर ८.१५ ते ९.१५ टक्क्यांदरम्यान वाढला आहे. बँकेचे नवीन दर १६ जानेवारी २०२३ पासून लागू झाले आहेत.
हेही वाचा – Salary Account Benefits : तुमच्या फायद्याची बातमी..! सॅलरी अकाऊंटवर मिळतात ‘या’ सुविधा; जाणून घ्या!
तुमचा EMI वाढेल
MCLR वाढल्याने मुदत कर्जावरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे एका वर्षाच्या किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरावर आधारित असतात. अशा परिस्थितीत MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.
Kotak Mahindra Bank reduces 1-year MCLR rate by 20 bps, revises base rates
Read here: https://t.co/ppbpnb49k6 pic.twitter.com/UToytsWcGd
— Mint (@livemint) November 16, 2022
MCLR म्हणजे काय?
MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत. महागाई कमी करण्याच्या उद्देशाने, भारतीय रिझर्व्ह बँकेने ७ डिसेंबर २०२२ रोजी द्विमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात आणखी ०.३५ टक्क्यांनी वाढ करून ६.२५ टक्के केली होती. RBI ने मे नंतर सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. यादरम्यान रेपो दर ४ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.