VIDEO : कॉफी विथ करण पुन्हा चर्चेत! दीपिकाचा खुलासा, रणवीर सिंगचा तिळपापड!

WhatsApp Group

Ranveer Singh Reaction On Deepika Padukone Video : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील उत्तम कपल मानले जाते. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले. दोघे नुकतेच करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण सीझन 8’ मध्ये दिसले होते. त्यांचा एपिसोड प्रसारित होताच दोघेही चर्चेत आले. आता या दोघांना ‘ढोंगी’ म्हटले जात आहे. दोघांचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, रणवीरला ‘रणवीर स्मिथ’ असेही संबोधले जात आहे, कारण त्याची परिस्थिती हॉलिवूड अभिनेता विल स्मिथसारखीच झाली आहे!

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 2018 साली लग्न केले होते, मात्र ते 2013 मध्ये ‘गोलियों की रासलीला: रामलीला’च्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. यापूर्वी दीपिकाचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले गेले होते. त्यांचे ब्रेकअपही चर्चेत होते.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’ या शोमध्ये दीपिकाने खुलासा केला की रणवीर सिंगने तिला प्रपोज करेपर्यंत ती कमिटेड नव्हती. तिने सांगितले की, तिच्या प्रेमभंगार, तिला फक्त आनंद घ्यायचा होता आणि कोणत्याही नात्यात बांधायचे नव्हते. रणवीरने तिला प्रपोज करेपर्यंत ती इतरांना डेट करत होती. मात्र, ती कुणालाही डेट करत असली तरी रणवीर सिंग तिच्या मनात होता.

हेही वाचा – VIDEO : “मुलाला विकायचंय…”, बापाने लावला सेल, कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल!

दीपिका हे सर्व सांगत असताना रणवीरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तो दीपिकाकडे एकटक पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि चिडचिड दिसत होती. त्यांची ही प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. त्याची अवस्था विल स्मिथसारखी झाल्याचे लोक म्हणत आहेत.

एका मुलाखतीदरम्यान विल स्मिथ आणि त्याची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ समोरासमोर होते. दोघेही आपापल्या आयुष्याबद्दल खुलासे करत होते. दरम्यान, जेडाने सांगितले की ती तिच्या मुलाचा मित्र आणि गायक ऑगस्ट अलसीनासोबत रिलेशनशिपमध्ये होती, जो तिच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान होता. मात्र, त्यांचे नाते गुंतागुंतीचे होते. याआधी जेडाने ‘ओपन मॅरेज’ संदर्भात हे विधान केले होते की तिने विलला परवानगी दिली आहे की तो काहीही करू शकतो. विल आणि जेडा 2016 पासून वेगळे राहत असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment