दुधाचा रंग पांढराच का असतो? लाल, हिरवा का नसतो? जाणून घ्या!

WhatsApp Group

Know Why Is The Colour Of Milk White : गाई-म्हशींच्या शरीरातील रक्त लाल असते, पण त्यांचे दूध हे पांढरेच का असते, याचा विचार केला तुम्ही कधी केला आहे का?इतकंच नाही तर या पृथ्वीतलावर जे प्राणी जन्माला घालू शकतात, त्यांच्या दुधाचा रंग पांढरा आहे. मनुष्य हा देखील या प्राण्यांपैकी एक आहे. पण असे का होते हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?

दुधाचा रंग पांढराच का?

दूध पांढरे असते कारण त्यात पांढर्‍या रंगाचे कॅसिन असते. कॅसिन हे दुधात असलेल्या मुख्य प्रथिनांपैकी एक आहे. कॅसिन हे दुधात असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फेटशी संयोग होऊन मिसेल नावाचे लहान कण तयार करतात. या मिसेलवर प्रकाश पडल्यावर ते अपवर्तन होऊन विखुरले जाते आणि त्यामुळे दूध पांढरे दिसते. याशिवाय दुधात असलेले फॅट हे देखील त्याच्या शुभ्रतेचे कारण आहे.

हेही वाचा – Video : उलटं होऊन सेहवागनं दिल्या सचिन तेंडुलकरला शुभेच्छा! कारण काय? वाचा!

गाईचे दूध हलके पिवळे का असते?

जर तुम्ही कधी नीट निरीक्षण केले असेल तर तुम्हाला कळेल की गाईचे दूध म्हशीच्या तुलनेत थोडेसे पिवळे दिसते. गाईचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा हलके असते आणि त्यात फॅटचे प्रमाणही कमी असते. यासोबतच त्यात केसिनचे प्रमाणही कमी असते, त्यामुळे गाईचे दूध फिकट पिवळे दिसते. दुधामध्ये प्रथिने, लैक्टोज, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम तसेच जीवनसत्त्वे, फॉस्फरस आणि इतर अनेक बायोएक्टिव्ह असतात.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment