Paytm Share Price : पेटीएमच्या शेअरहोल्डर्ससाठी आजचा दिवस खूप शुभ होता, कारण आज स्टॉकमध्ये 11 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली. पेटीएम ब्रँड अंतर्गत सेवा देणारी फिनटेक कंपनी One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात 11 टक्क्यांहून अधिक वाढले. अनेक शेअरहोल्डर्स आणि मार्केटमधील सहभागींना प्रश्न पडतो की शेअरमध्ये ही तेजी का?
कंपनीचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा यांनी Antfin (Netherlands) Holding BV कडून पेटीएममधील 10.30 टक्के भागभांडवल विकत घेण्याची घोषणा केल्यानंतर शेअरमध्ये वाढ झाली. हा व्यवहार कॅशलेस असेल. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 11.57 टक्क्यांनी वाढून 887.55 रुपये झाली. मात्र, आज हा समभाग 7 टक्क्यांच्या वाढीसह 851 रुपयांवर बंद झाला.
Aug 5: Vijay Shekhar Sharma (founder) increases his stake in Paytm!📊
Aug 7: Paytm share price shots up by 7% over the weekend!📉POWER OF PROMOTER'S DECISION ON MARKETS #sharemarket #Paytm #Nifty pic.twitter.com/XVE7uwVSW4
— Asset Yogi (@assetyogi) August 7, 2023
हेही वाचा – Fellowship : मोफत मिळवा 7 लाखांची फेलोशिप! लगेच करा Apply
करारानुसार, शर्मा पेटीएममधील 10.3 टक्के भागभांडवल Antfin कडून त्यांच्या 100 टक्के विदेशी संस्था रेझिलिएंट अॅसेट मॅनेजमेंट BV द्वारे विकत घेतील. शर्माला हस्तांतरित करण्यात येणार्या स्टेकचे आर्थिक अधिकार अँटफिनकडेच राहतील. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या संपादनासाठी कोणतेही रोख पेमेंट केले जाणार नाही किंवा शर्मा यांच्याकडून थेट किंवा अन्यथा कोणतेही तारण, हमी किंवा अन्य मूल्य आश्वासन दिले जाणार नाही.
अलीकडेच, पेटीएमने एप्रिल-जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या कालावधीत कंपनीचा तोटा 3458 कोटी रुपयांवर आला, तर 2022 च्या जून तिमाहीत कंपनीला 645 कोटी रुपयांचा तोटा झाला. कंपनीने सांगितले होते की ऑपरेटिंग उत्पन्न वाढल्यामुळे तोटा कमी झाला आहे. ऑपरेटिंग उत्पन्न 39.4 टक्क्यांनी वाढून 2341.6 कोटी रुपये झाले. जून 2022 च्या तिमाहीत ते 1679 कोटी रुपये होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!