Google ची मूळ कंपनी Alphabet चे CEO सुंदर पिचाई यांनी 2022 मध्ये सुमारे 19 अरब रुपये कमावले आहेत. स्टॉक अवॉर्ड्सच्या रूपाने त्यांना यातील बहुतेक भाग मिळाला. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये सुंदर पिचाई यांना 226 मिलियन डॉलर (1854 कोटी रुपये) पगार मिळाला आहे. कंपनीत काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्याच्या उत्पन्नापेक्षा हे 800 पट जास्त आहे. विशेष म्हणजे या वर्षी जानेवारीमध्ये गुगलने 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.
माध्यमांच्या बातम्यांनुसार, सुंदर पिचाई यांना अनेक उत्पादनांचे यशस्वी लॉन्चिंग आणि सीईओ पदावर बढती दिल्याबद्दल ही मोठी रक्कम पगार म्हणून देण्यात आली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की त्याचा पगार इतका दिसत आहे कारण त्याच्याकडे सुमारे 218 मिलियन डॉलर्स किंवा 17.88 अरब रुपयांचा स्टॉक अवॉर्ड आहे. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली Google ने त्यांच्या प्रमुख जाहिराती आणि YouTube व्यवसायातून नफा कमावला. यावेळी कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही गुंतवणूक केली आहे. सुंदर पिचाई हे सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आहेत. भारतवंशी पिचाई यांनी आयआयटी खडगपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले.
My favorite part of this story is that Google CEO Sundar Pichai’s personal security detail alone costs $5.94 million a year. Utterly crap management, layoffs, and silly high exec pay. pic.twitter.com/m0InE01eao
— Matt Stoller (@matthewstoller) April 21, 2023
हेही वाचा – IPL 2023 : हैदराबादच्या खेळाडूवर भडकला जडेजा..! विकेट घेताच काढला राग; पाहा Video
मोठ्या प्रमाणावर कपात
गुगलने जानेवारी महिन्यात 12,000 लोकांना कंपनीतून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला. त्याचा परिणाम जगभरातील गुगलच्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला. याशिवाय गुगल ऑफिसमध्ये खर्च कमी करण्याच्या विविध उपायांवर काम करत आहे. छाटणीबाबत सुंदर पिचाई म्हणाले होते की, कंपनीसाठी हा कठीण पण योग्य निर्णय आहे. पुढील रणनीती लक्षात घेऊन हे केले जात असल्याचे ते म्हणाले होते.
कपातच्या विरोधात संताप
कपातच्या विरोधात संताप व्यक्त करत गुगलच्या कर्मचाऱ्यांनी लंडन कार्यालयातून बाहेर पडून राजीनामा दिला. केवळ इंग्लंडमध्येच नाही तर स्वित्झर्लंडमध्येही हेच दिसून आले. तेथेही कंपनीने 200 जणांना कामावरून काढून टाकल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून कंपनी सोडली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!