

Indian Railways : आपण ट्रेनमधून खूप वेळा प्रवास करतो. त्यामुळे तुम्हाला एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि मेल हे प्रकार माहीत आहेत. पण जेव्हा तुम्ही कमी पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करता तेव्हा त्यांच्या नावांसोबत इंग्रजीमध्ये डेमू (DEMU), एमू (EMU) किंवा मेमू (MEMU) हे शब्द जोडले जातात. या शब्दांचा अर्थ काय आहे. ते कधी आणि कोणत्या प्रकारच्या ट्रेनमध्ये वापरले जातात, तुमच्यापैकी अनेकांना याबद्दल नक्कीच माहिती नसेल.
DEMU गाड्या
DEMU चे पूर्ण रूप डिझेल मल्टिपल युनिट आहे. खरे तर ज्या गाड्या कमी अंतरासाठी डिझेलवर धावतात त्यांना डेमू ट्रेन म्हणतात. अशा गाड्यांच्या 3 श्रेणी आहेत, ज्यात डिझेल इलेक्ट्रिक DEMU, डिझेल हायड्रॉलिक DEMU आणि डिझेल मेकॅनिकल DEMU गाड्यांचा समावेश आहे. या ट्रेन्सची खासियत म्हणजे प्रत्येक तीन डब्यांनंतर एक पॉवर कोच समाविष्ट केला जातो, ज्यामुळे या ट्रेन्सला एनर्जी एफिशिएंट ट्रेन्स असेही म्हणतात.
हेही वाचा – IPL 2023 : लिव्हिंगस्टोनचे 9 सिक्स, दिल्लीची घाणेरडी फिल्डींग, तरीही पंजाब हरली!
EMU गाड्या
EMU म्हणजे इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन. या ट्रेन्सचा वापर मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली यासारख्या मोठ्या महानगरांना जवळच्या शहरांशी जोडण्यासाठी केला जातो. या सर्व गाड्या विजेवर धावतात आणि त्यांचा वेग ताशी 60 ते 100 किमी आहे. या गाड्यांमध्ये एक प्रकारचा पेंटोग्राफ बसवला जातो, जो ट्रेनच्या इंजिनला वीज पुरवण्याचे काम करतो.
MEMU गाड्या
MEMU म्हणजे मेन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट. अशा ट्रेन्स प्रगत फीचर्स आणि उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. या गाड्या साधारणपणे 200 किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. अशा गाड्यांमध्ये प्रत्येक 4 डब्यामागे एक पॉवर कार देखील असते. ज्याच्या मदतीने ट्रेनची ट्रॅक्शन मोटर धावते आणि वेग धरून पुढे जाते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!