Staple Visa : ‘स्टेपल व्हिसा’ काय आहे? भारत-चीन संबंध का चिघळलेत?

WhatsApp Group

Staple Visa : चीनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिएड गेम्ससाठी अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंना स्टॅम्प व्हिसा देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या खेळाडूंना विविध प्रकारचे व्हिसा देण्यासाठी चीनने बराच वेळ घेतला होता. याबाबत भारताने संपूर्ण संघाला चेंगडूला पाठवण्यापासून रोखले. अशा परिस्थितीत, जाणून घेऊया हा स्टेपल व्हिसा काय आहे आणि इतर व्हिसांपेक्षा तो किती वेगळा आहे? चीन हा व्हिसा का देतो आणि भारत सरकारची समस्या काय आहे?

स्टेपल व्हिसा म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या देशात जायचे असते तेव्हा त्याला त्या देशाची परवानगी घ्यावी लागते, ज्याला व्हिसा म्हणतात. पर्यटक व्हिसा, बिझनेस व्हिसा, ट्रान्झिट व्हिसा, पत्रकार व्हिसा, एंट्री व्हिसा, ऑन अरायव्हल व्हिसा आणि पार्टनर व्हिसा असे विविध प्रकारचे व्हिसाचे पर्याय आहेत. चीनने या खेळाडूंसाठी स्टेपल व्हिसा जारी केला होता. या प्रकारच्या व्हिसामध्ये इमिग्रेशन अधिकारी पासपोर्टवर शिक्का मारत नाही, तर पासपोर्टला वेगळा कागद किंवा स्लिप जोडतो.

स्टॅम्प सहसा ती व्यक्ती कोणत्या उद्देशाने त्या देशाला भेट देत आहे हे सूचित करते. स्टेपल व्हिसामध्ये, प्रवासाचा उद्देश व्यक्तीच्या पासपोर्टसह वेगळ्या शीटवर लिहिला जातो. इमिग्रेशन अधिकारी त्या कागदावर शिक्का मारतो. याला स्टेपल व्हिसा म्हणतात.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : क्रूड ८४ डॉलरच्या जवळ! दर बदलले, ‘या’ शहरात पेट्रोल डिझेल महागले

कोणत्या देशांमध्ये स्टेपल व्हिसा?

अनेक देशांद्वारे स्टेपल्ड व्हिसा जारी केला जातो. या देशांमध्ये क्युबा, इराण, सीरिया आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. यापूर्वी चीन आणि व्हिएतनामने आपल्या नागरिकांना स्टेपल व्हिसा दिला होता, परंतु या देशांमधील करारानंतर त्यांना व्हिसा सूट मिळाली आहे. अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या दोन भारतीय राज्यांतील नागरिकांना चीन स्टेपल व्हिसा जारी करतो.

काय फरक पडतो?

स्टेपल व्हिसा असलेल्या व्यक्तीला काम संपल्यानंतर त्याच्या देशात परत जावं लागलं, तर त्याला त्याच्या पासपोर्टसोबत आलेली स्लिप फाडावी लागते. प्रवासाचे कारण आणि शिक्का या स्लिपवर आहे. तसेच त्या देशात एंट्री आणि एक्झिट पासही फाडले जातात. अशा प्रकारे प्रवास करणार्‍या व्यक्तीच्या पासपोर्टमध्ये प्रवासाविषयी कोणतीही माहिती राहत नाही. भारत सरकार आणि प्रशासनासमोर सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आव्हान निर्माण होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment