काय असतं Masked Aadhaar कार्ड? कसं काढायचं? दोन मिनिटांत करा डाऊनलोड!

WhatsApp Group

आजच्या काळात आधार (Aadhaar Card) खूप महत्त्वाची गोष्ट बनली बनली आहे. बँक खाते उघडण्यासाठी, शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्ड मिळवण्यासाठी आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधारचा वापर वाढल्याने त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मास्क्ड आधार (Masked Aadhaar) सुरू केले. यामुळे तुमचा तपशील चोरीला जाण्याचा धोका कमी होतो. तसेच, तो एक सुरक्षित पर्याय म्हणून उदयास येत आहे. मास्क आधार कार्ड म्हणजे काय ते जाणून घेऊया.

मास्क्ड आधार म्हणजे काय?

मास्क्ड आधार हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) गोपनीयतेत वाढ करण्यासाठी आणि आधार माहितीचा धोका कमी करण्यासाठी सादर केलेले फीचर आहे. मास्क्ड आधारमध्ये, आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक लपलेले असतात, तर फक्त शेवटचे 4 अंक दिसतात. नाव, फोटो आणि QR कोड यासारखे महत्त्वाचे तपशील दृश्यमान असतात.

हेही वाचा – कोणतीही परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची संधी, विनामूल्य भरा अर्ज!

आपण कुठे वापरू शकतो?

UIDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या संस्थांना परवाना आहे तेच तुमचे आधार कार्ड तपशील आणि कार्ड ठेवू शकतात. म्हणजे परवाना नसलेल्या संस्था तुमचे आधार गोळा करू शकत नाहीत. त्यामुळे, जेव्हाही तुम्ही परवाना नसलेल्या ठिकाणी जाल तेव्हा तुम्ही मास्क्ड आधार वापरू शकता. तुम्ही ते UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून सहज डाउनलोड करू शकता.

कसे डाउनलोड करावे?

  • सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in वेबसाइटवर जा.
  • तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी प्रविष्ट करा, कॅप्चा भरा आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा. यानंतर Services विभागातून Download Aadhaar निवडा.
  • Do you want a masked Aadhaar? पर्याय निवडा. Review your Demographics Data अंतर्गत तुम्हाला हा पर्याय मिळेल.
  • यानंतर Download वर क्लिक करा. मास्क्ड आधार PDF स्वरूपात डाउनलोड केला जाईल.
  • हे आधार कार्ड उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड देखील आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड असा आहे – तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे (आधारमधील) मोठ्या अक्षरात आणि तुमच्या जन्माचे वर्ष YYYY मध्ये टाकावे लागतील. उदाहरणार्थ, जर तुमचे नाव Shubham असेल आणि तुमचे जन्म वर्ष 2003 असेल, तर तुमचा पासवर्ड SHUB2003 असेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment