Mahabharat : अर्जुनचं गांडीव धनुष्य का खास होतं? ‘या’ गोष्टी ऐकून चकित व्हाल!

WhatsApp Group

Arjuna’s Gandiva Dhanush In Mahabharat : महाभारताच्या महायुद्धात अर्जुनाने गांडीव धनुष्याने कौरवांच्या प्रचंड सैन्याचा पराभव करून विजय मिळवला. या धनुष्यामुळेच त्या काळात सर्वजण अर्जुनाला महान धनुर्धर मानत होते. या धनुष्याचा कोणते गुणे होते, ज्यामुळे शत्रू घाबरायचे? गांडीव धनुष्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते अर्जुनाशिवाय दुसरे कोणी उचलू शकत नव्हते. तसेच यातील बाण कधीच संपत नव्हते.

अर्जुनच्या गांडीव धनुष्याबद्दलच्या गोष्टी

भगवान रामाला हे धनुष्य भगवान शिवाचा अवतार असलेल्या परशुराम यांच्याकडून मिळाले होते, ज्या वेळी भगवान रामाने सीतेच्या स्वयंवराच शिवाचे धनुष्य तोडले आणि परशुराम तिथे उपस्थित होते.

हे धनुष्य रामकडूव अर्जुनपर्यंत कसे पोहोचले, त्याआधी हे दैवी धनुष्य परशुरामजींकडे कुठून आले ते जाणून घ्या. विष्णुधर्मोत्तर पुराणाच्या पहिल्या भागात, हे दैवी धनुष्य भगवान शिवाने परशुरामांना पाताळात उपस्थित असलेल्या राक्षसांना मारण्यासाठी दिले होते, असा उल्लेख आहे.

हेही वाचा – रायगडमध्ये मिळणार रोजगार! महाराष्ट्र शासनाकडून ‘या’ 125 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

भगवान शिवाला हे धनुष्य भगवान विष्णूकडून मिळाले त्या वेळी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्यात युद्ध झाले आणि दोघेही समान होते. युद्धानंतर भगवान विष्णूंनी आपले धनुष्य भगवान शिवाला दिले आणि भगवान शिवाने आपले धनुष्य भगवान विष्णूला दिले.

नंतर वरुण देवाने हेच धनुष्य अर्जुनाला दिले जे अर्जुनाने स्वर्गात जाताना वरुण देवाला परत केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment