जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने पुन्हा एकदा myAadhaar पोर्टलद्वारे आधार तपशील मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 3 महिने म्हणजे 15.12.2023 ते 14.03.2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट (Update Free Aadhaar Card In Marathi) केल्यास तुम्हाला त्यासाठी शुल्क द्यावे लागेल. सरकारने म्हटले आहे की ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षे जुने आहे, त्यांनी ते कोणत्याही परिस्थितीत अपडेट करावे.
तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये तुमच्या घराचा पत्ता, फोन नंबर, नाव, ईमेल आयडी इत्यादी अपडेट करू शकता. परंतु जर तुम्हाला फोटो, बायोमेट्रिक आणि आयरिस यांसारखी माहिती अपडेट करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला नावनोंदणी केंद्रावर जाऊन शुल्कही भरावे लागेल.
हेही वाचा – UPSC कडून अनेक पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर
आधार अपडेट कसे करायचे?
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
- यानंतर अपडेट आधारच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा.
- आता तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- पत्ता पर्याय निवडा.
- यानंतर तुम्हाला Proceed to Update Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
- आता अपडेट केलेल्या पत्त्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
- यानंतर एक रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल.
- हा नंबर सेव्ह करा. तुमचा आधार काही दिवसांनी अपडेट होईल.
- तुम्ही रिक्वेस्ट नंबरद्वारे तुमच्या आधारचे स्टेटस तपासू शकता.
शेवटच्या तारखेनंतर किती पैसे भरावे लागतील?
जर तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट केले नाही, तर तुम्हाला त्यानंतर ते अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. 14 डिसेंबरनंतर आधार कार्ड अपडेटसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल. UIDAI ने म्हटले आहे की ही सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर अपडेट केली जाऊ शकते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!