LIC Premium : कुठेही जाण्याची गरज नाही..! घरी बसून मिनिटांत भरा LIC प्रीमियम; वाचा!

WhatsApp Group

LIC Premium : जर तुम्हाला थेट शाखेत जाऊन तुमचा LIC प्रीमियम भरणे कठीण वाटत असेल, तर आता तुम्ही ऑनलाइन पैसे भरून त्यातून दिलासा मिळवू शकता. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने त्यांच्या पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी काही ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही तुमच्या LIC पॉलिसीचा प्रीमियम घरी बसून जमा करू शकता. जाणून घेऊया प्रक्रिया..

आता एलआयसी पे डायरेक्ट अॅप किंवा एलआयसी वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा गुगलपे, अॅमेझॉन सारख्या लोकप्रिय पेमेंट अॅप्सद्वारे घरी बसून एलआयसी पॉलिसी प्रीमियम जमा करू शकता. एलआयसीच्या वेबसाइटवरून प्रीमियम जमा करण्यासाठी, तुम्हाला प्रथम www.licindia.in वर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला येथे ‘पे डायरेक्ट’ लिहिलेले दिसेल जेथे तुम्ही लॉगिन न करताही प्रीमियम भरू शकता.

पेटीएमद्वारे एलआयसी प्रीमियम कसा भरायचा?

  • प्रथम पेटीएम अॅप उघडा.
  • एलआयसी इंडियाचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करा.
  • एलआयसी पॉलिसी क्रमांक भरावा लागेल आणि उर्वरित तपशील आपोआप येतील.
  • आता Proceed For Payment या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर पेमेंट पर्याय निवडा. तुमचा प्रीमियम जमा केला जाईल.

हेही वाचा – फक्त २५० रुपयांमध्ये ९ OTT चे सबस्क्रिप्शन..! ‘या’ कंपनीने आणली जबरदस्त ऑफर

PhonePe द्वारे LIC प्रीमियम कसा भरावा?

  • प्रथम PhonePe अॅप उघडा.
  • विमा प्रीमियम भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल आणि त्यावर क्लिक करावे लागेल.
  • LIC प्रीमियम पेमेंट पर्याय निवडा. तुमचा LIC नंबर आणि ईमेल आयडी एंटर करा आणि कन्फर्म बटण दाबा.
  • त्यानंतर पेमेंट पर्याय निवडा. तुमचा प्रीमियम जमा केला जाईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment