अनेकदा लोक त्यांचा वायफाय म्हणजेच इंटरनेट स्पीड कसा वाढवावा, याबद्दल माहिती घेत असतात. कधीकधी अनेकजण इंटरनेटबाबत आपल्या कंपनीकडे तक्रार करतात. अशा परिस्थितीत लोक इंटरनेट स्पीड (Internet Speed) वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक शोधत असतात. अशीच एक ट्रिक इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की तुम्ही अॅल्युमिनियम फॉइल पेपरच्या मदतीने इंटरनेट स्पीड वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही ट्रिक आणि ती कशी वापरली जाते.
ही ट्रिक वाय-फाय राउटरद्वारे (Wifi Router) केली जाते. तुमचा वाय-फाय राउटर जिथे इन्स्टॉल आहे, तिथे तुम्हाला त्याच्या मागे अॅल्युमिनियम फॉईल पेपर ठेवावा लागेल. कोल्ड ड्रिंकचे कॅन कापूनही तुम्ही असे करू शकता. यामध्ये तुम्हाला वर दिलेल्या फोटोनुसार अॅल्युमिनियम लावावे लागेल, ज्यामुळे सिग्नल वाढतो. यासाठी तुम्हाला फक्त अॅल्युमिनिअम पेपरची गरज आहे.
हे कसे काम करते?
अहवालानुसार, यामुळे इनडोअर वायरलेस सिग्नलचा प्रवाह सुधारू शकतो आणि होम नेटवर्कचे कव्हरेज वाढू शकते. अँटिनाच्या मागे बसवलेला अॅल्युमिनियम पेपर सिग्नलची फ्रिक्वेंसी वाढवण्याचे काम करतो, ज्यामुळे इंटरनेट सहज काम करू लागते. रीडर्स डायजेस्टने आपल्या एका अहवालात डार्टमाउथ कॉलेजने केलेल्या अनेक संशोधनांमधून हे बरोबर असल्याचे मान्य केले आहे आणि त्यामुळे बरेच फायदे झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या संशोधनात अनेक प्रयोग झाले, त्यात हा जुगाड बरोबर निघाला.
हेही वाचा – WiFi : तुमचा वाय-फाय इंटरनेट चोरून कोण-कोण वापरतंय, ‘असं’ चेक करा!
काही संशोधनातून असे दिसून आले की काही ठिकाणी वायरलेस सिग्नल 55.1% ने वाढले होते. काही YouTube व्हिडिओ ही ट्रिक चुकीची मानतात.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!