Threads अॅप डाऊनलोड करताय? सावधान! होऊ शकतं नुकसान!

WhatsApp Group

Threads App : इंस्टाग्रामने नवीन मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म थ्रेड्स अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप अगदी ट्विटरसारखे आहे. पण थ्रेड्स अॅप डाउनलोड करताना स्वतःचे काही धोके असू शकतात. कारण थ्रेड्स अॅपवर तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो, असा दावा काही रिपोर्ट्समध्य केला जात आहे. कारण थ्रेड्स अॅप थेट Instagram वरून साइन-इन केले जाऊ शकते. याचा अर्थ थ्रेड्स अॅपमध्ये साइन इन करणे खूप सोपे आहे.

परंतु थ्रेड्स अॅपमधून बाहेर पडणे सोपे नाही. तुम्ही थ्रेड्स प्रोफाइल तात्पुरते निष्क्रिय करू शकता. याचा तुमच्या इंस्टाग्राम खात्यावर परिणाम होणार नाही. परंतु जर तुम्ही इंस्टाग्राम खाते निष्क्रिय केले तर थ्रेड्स अॅप देखील निष्क्रिय केले जाईल.

हेही वाचा – Video : मार्क वुडचा झंझावात! 155 किमी वेगाने गोलंदाजी; ख्वाजाच्या उडवल्या दांड्या!

थ्रेड्स अॅप डेटा पॉलिसी

Twitter आणि Threads च्या डेटा संकलन धोरणाचा विचार करा, तर थ्रेड्स ट्विटर पेक्षा जास्त डेटा गोळा करत आहे. थ्रेड्स अॅप आरोग्य आणि फिटनेस डेटा देखील संकलित करते, त्यामुळे यूजरच्या गोपनीयतेच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या मते, थ्रेड्स वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती जसे की पेमेंट, संपर्क, सामग्री, शोध, ब्राउझिंग इतिहास अॅक्सेस करतात.

अॅप लाँच झाल्यानंतर थ्रेड्स अत्यंत लोकप्रिय होत आहे. अहवालानुसार, अॅप 7 तासांत सुमारे 10 मिलियनवेळा डाउनलोड केले गेले आहे. थ्रेड्स अॅप चर्चेचा मुद्दा राहिला आहे. थ्रेड्स अॅप ट्विटरवरील टॉप ट्रेंडिंग लिस्टपैकी एक बनले आहे. थ्रेड्स अॅपबाबत वापरकर्ते मजेदार मीम्स बनवत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment