

8th Pay Commission : देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. पगार आणि निवृत्ती वेतनवाढीबाबत केंद्र सरकारला अहवाल सादर करणाऱ्या आयोगाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार असून त्यापूर्वी आयोग आपला अहवाल सादर करेल. अशा परिस्थितीत आठवा वेतन आयोग स्थापन होऊन पगार आणि पेन्शन वाढवण्याची शिफारस केली, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
8व्या वेतन आयोगाबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकार त्याची घोषणा करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. आयोगाच्या स्थापनेनंतर, देशाची सध्याची आर्थिक स्थिती आणि अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन वेतन आणि निवृत्ती वेतन वाढीबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठवेल, ज्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की संयुक्त सल्लागार समितीच्या राष्ट्रीय परिषदेने 8 व्या वेतन आयोगासह फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणीही सरकारकडे केली आहे. 7 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरचा दर 2.57 होता, तो यावेळी 2.86 पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वेतन आयोग लागू केला जातो आणि पगार आणि पेन्शन वाढवले जाते.
सातव्या वेतन आयोगाची गणिते पाहिल्यास लक्षात येईल की, त्याच्या अंमलबजावणीपूर्वी किमान मूळ वेतन फक्त 7 हजार रुपये होते. 7 व्या वेतन आयोगात, फिटमेंट फॅक्टर 2.57 पर्यंत वाढविण्यात आला, त्यानंतर किमान मूळ वेतन 18,000 रुपये झाले. म्हणजे पूर्वीचे मूळ वेतन 7 हजार रुपये 2.57 पटीने वाढवून 18 हजार रुपये करण्यात आले. त्याचप्रमाणे, जर 8 व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 2.86 केला तर किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून 51,480 रुपये होईल. याचा अर्थ पगार सुमारे 3 पट वाढू शकतो.
8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगाराप्रमाणे पेन्शनमध्येही लक्षणीय वाढ होणार आहे. सध्या किमान पेन्शन 9 हजार रुपये आहे, जी 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार 25,740 रुपये होईल. ही गणना केवळ किमान मूळ वेतन आणि पेन्शनसाठी आहे. मूळ वेतनासोबतच कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा म्हणजेच डीएचाही लाभ मिळेल आणि वास्तविक पगार यापेक्षा कितीतरी अधिक असेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!