To Become A Millionaire In India : भारतातील एक सामान्य कर्मचारी म्हणून तुम्हाला $1 मिलियन (अंदाजे 8.22 कोटी) कमवायला किती वर्षे लागतील? हा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचे उत्तर काय असेल. 5 वर्षे, 10 वर्षे, किंवा कदाचित 25 वर्षे किंवा 50 वर्षे? तुम्ही याचे उत्तर देऊ शकणार नाही. एका अभ्यासात धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतातील एका सामान्य कर्मचाऱ्याला इतके पैसे कमवायला किती वेळ लागेल याचा अंदाज क्वचितच कोणी लावू शकेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म पिकोडीच्या अभ्यासात असे म्हटले आहे की भारतात ही रक्कम मिळवण्यासाठी सामान्य माणसाला 148 वर्षे लागतील.
हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल पण अभ्यासात हेच समोर आले आहे. भारताचा जीडीपी झपाट्याने वाढत असला तरी दरडोई उत्पन्न अजूनही सुमारे 130 देशांच्या मागे आहे. याचा परिणाम असा आहे की भारतात 1 मिलियन डॉलर्स कमवायला 148 वर्षे आणि 5 महिने लागतील. कृपया लक्षात घ्या की ही सरासरी वेळ आहे. अभ्यासाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या यादीत भारत 62व्या स्थानावर आहे. या अभ्यासासाठी, भारतातील कर्मचार्याचा सरासरी मासिक पगार 46,188 रुपये ($562) घेतला गेला आहे.
हेही वाचा – ITR Filing : आयटीआर भरण्याचा आज शेवटचा दिवस! घरीच भरा टॅक्स रिटर्न; वाचा प्रोसेस!
कोणता देश सर्वात वर आहे?
या सर्वेक्षणात 102 देशांचा समावेश करण्यात आला असून सरासरी मासिक निव्वळ वेतनाच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये स्वित्झर्लंडने बाजी मारली आहे. अभ्यासानुसार, स्वित्झर्लंडचे नागरिक 14 वर्षे आणि तीन महिन्यांत पहिले मिलियन सर्वात जलद कमावतील. या यादीत चीन 42व्या स्थानावर आहे. तेथील नागरिक भारतापूर्वी 71 वर्षांपूर्वी म्हणजे 78 वर्षे 9 महिन्यांत 1 मिलियन डॉलर्स कमवू शकतील. भारत आणि ब्रिटनमध्ये 120 वर्षांचा फरक आहे. या यादीत यूके 29 वर्षे 9 महिन्यांसह 17 व्या क्रमांकावर आहे. तेवढी रक्कम पाकिस्तानात मिळवण्यासाठी ६२१ वर्षे ३ महिने लागतील.
टॉप-10 देश
- स्वित्झर्लंड (14 वर्षे 3 महिने)
- सिंगापूर (16 वर्षे 11 महिने)
- लक्झेंबर्ग (17 वर्षे 4 महिने)
- युनायटेड स्टेट्स (19 वर्षे 10 महिने)
- आइसलँड (20 वर्षे 11 महिने), कतार (21 वर्षे 3 महिने)
- यूएई (23 वर्षे 9 महिने)
- ऑस्ट्रेलिया (24 वर्षे 3 महिने)
- डेन्मार्क (24 वर्षे 6 महिने)
- नेदरलँड्स (24 वर्षे 9 महिने)
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!