2000 Rs Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्याकडे 2000 रुपयांची फाटलेली नोट असेल तर त्याची किंमत किती असेल?? तुम्हाला माहिती नसेल तर ही माहिती वाचा.
माहिती देताना आरबीआयने म्हटले आहे की, 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या नोटा बँकेत जमा करू शकता किंवा त्या बदलून घेऊ शकता. यावेळी लोकांच्या मनात 2000 रुपयांची नोट बदलण्याचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
फाटलेल्या नोटांचे किती पैसे मिळतात?
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार फाटलेल्या नोटाही बदलता येतात. देशात निरुपयोगी नोटा बदलण्याचे नियम थोडे वेगळे आहेत. आरबीआयने सांगितले की, फाटलेल्या नोटा बदलल्यानंतर त्याच्या अटीनुसार पैसे दिले जातील. जर तुमच्याकडे 2000 रुपयांची फाटलेली नोट असेल तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही.
हेही वाचा – ICICI आणि पंजाब नॅशनल बँकेच्या करोडो ग्राहकांना मोठा झटका!
नोटची लांबी आणि रुंदी
आरबीआयने सांगितले की, फाटलेल्या नोटा बदलणे त्यांच्या स्थितीवर अवलंबून आहे. आरबीआयच्या वेबसाइटनुसार, 2000 रुपयांच्या नोटेची लांबी 16.6, रुंदी – 6.6 आणि क्षेत्रफळ 109.56 आहे. अशा स्थितीत नोट 88 स्क्वेअर सेमी असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील, तर 44 स्क्वेअर सेमीवर फक्त अर्धे पैसे मिळतील.
बँक फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारत नाही, परंतु अधिक वाईट स्थितीत नोटा बदलून घेण्यास नकार देऊ शकते. आरबीआय कार्यालयात ज्यांची स्थिती वाईट आहे अशा नोटा तुम्ही जमा करू शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!