एकाच ठिकाणी १६ देव..! दसऱ्याला दुबईत उघडलं हिंदू मंदिर; पाहा Video

WhatsApp Group

Dubai Hindu Temple : दुबईत भारतीयांचे स्वप्न साकार झाले आहे. UAE चे सहिष्णुता मंत्री शेख नह्यान बिन मुबारक यांच्या हस्ते नवीन हिंदू मंदिराचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले आहे. UAE मधील भारताचे राजदूत संजय सुधीर, कम्युनिटी डेव्हलपमेंट अथॉरिटी (CDA) साठी सामाजिक नियामक आणि परवाना देणारी एजन्सीचे सीईओ डॉ. ओमर अल मुथन्ना, दुबई हिंदू मंदिराचे विश्वस्त राजू श्रॉफ यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. ३ वर्षात बांधलेल्या या भव्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या प्रार्थनामंडपात १६ देवतांच्या मूर्ती आहेत. ज्यामध्ये भगवान शिव, कृष्ण, गणेश, देवी महालक्ष्मी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गुरू ग्रंथसाहिबही त्यात ठेवण्यात आला आहे.

ANI च्या मते, दसरा उत्सवाच्या एक दिवस आधी त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि हे मंदिर संयुक्त अरब अमिरातीतील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक असलेल्या सिंधी गुरु दरबार मंदिराचा विस्तार आहे. मंदिराची पायाभरणी फेब्रुवारी २०२० मध्ये झाली. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, मंदिर आजपासून अधिकृतपणे लोकांसाठी खुले होणार आहे.

हेही वाचा – Adipurush Teaser : “ओम…तू माझ्या रूममध्ये ये”, मराठी दिग्दर्शकावर चिडला प्रभास; Video व्हायरल

२०१९ मध्ये मंदिरासाठी जमीन

हे मंदिर तीन वर्षांत बांधल्याची माहिती आहे. मंदिरासाठी जमीन यूएई सरकारने २०१९ मध्ये दिली होती. जेव्हा महामारी शिखरावर होती, तेव्हा त्याला समुदाय विकास प्राधिकरण, दुबई नगरपालिका, दुबई पोलीस आणि दुबई जमीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती. मंदिरात सर्व धर्माच्या लोकांचे स्वागत असल्याचे मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले. हे ८०,००० स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधले आहे.

मंदिरातील वेबसाइटच्या माध्यमातून क्यूआर-कोड आधारित अपॉइंटमेंट बुकिंग सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून मंदिरात गर्दी दिसून येत आहे. मुख्य प्रार्थना हॉलमध्ये बहुतेक देवता स्थापित केल्या आहेत, ज्यामध्ये 3D-मुद्रित गुलाबी कमळ आहे. मंदिराच्या अधिकृत वेबसाइटनुसार दुबईतील नवीन हिंदू मंदिर सकाळी साडेसहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले असेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment