Ration Card : भारतात रेशन कार्डचे कोणते प्रकार आहेत? त्याच्या रंगांचा अर्थ काय?

WhatsApp Group

 Ration Card : रेशन कार्ड हे देशातील एक महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते, जे नागरिकांच्या ओळख आणि रहिवासी पुराव्यासाठीच नव्हे, तर अनुदानित अन्नधान्य मिळविण्यासाठीही आवश्यक आहे. शासकीय योजनेंतर्गत रेशन दुकानातून धान्य घेणे असो किंवा बँक खाते उघडणे असो, शाळा-कॉलेजात, न्यायालयात, सरकारी, खासगी कार्यालयात वापरण्यासाठी अनेक ठिकाणी रेशन कार्ड आवश्यक असते. सरकार लोकांना अनेक प्रकारचे रेशन कार्ड देत असते. या रेशन कार्डच्या विविध रंगांनुसार वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. साधारणपणे कौटुंबिक उत्पन्नाच्या आधारे रेशन कार्ड दिले जाते.

आधार कार्ड येण्यापूर्वी रेशन कार्डला खूप महत्त्व होते, तरीही ते खूप महत्त्वाचे आहे. केवळ सरकारी रेशनच नाही तर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा मानला जाणारे हे कार्ड गरीब आणि श्रीमंत कुटुंबांसाठीही आवश्यक आहे. राज्य सरकारकडून रेशन कार्ड जारी केले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांच्या रेशन कार्डमध्ये फरक दिसून येतो. याशिवाय, या कार्डावर मिळणारे सरकारी फायदेही राज्यांनुसार बदलू शकतात.

भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त 4 प्रकारची रेशन कार्डे आहेत, जी वेगवेगळ्या रंगांनी ओळखली जातात. यामध्ये निळ्या, गुलाबी, पांढऱ्या आणि पिवळ्या रेशन कार्डचा समावेश आहे. ते वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांना दिले जातात.

निळे, हिरवे, पिवळे रेशन कार्ड

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दिलेले रेशन कार्ड राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानुसार निळे, हिरवे किंवा पिवळे असते. या कार्डवर जास्तीत जास्त फायद्यांची परवानगी आहे आणि ज्या कुटुंबांकडे एलपीजी कनेक्शन देखील नाही त्यांना ते जारी केले जाते. हे रेशन कार्ड ग्रामीण भागातील 6400 रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाला दिले जाते. दुसरीकडे, शहरी भागात, 11,850 रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाला हे रेशन कार्ड मिळू शकते.

गुलाबी शिधापत्रिका

ज्या कुटुंबांचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्यरेषेच्या वर आहे त्यांना गुलाबी रेशन कार्ड दिले जाते. हे कार्ड ग्रामीण भागात वार्षिक 6400 रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या कुटुंबांना दिले जाते. दुसरीकडे, शहरी भागातील 11,850 रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना हे गुलाबी रंगाचे रेशन कार्ड मिळू शकते. या कार्डावर कुटुंबप्रमुखाचा फोटोही चिकटवण्यात आला आहे.

हेही वाचा – Home Loan : फ्लॅट किंवा घर करण्यासाठी किती सॅलरी असायला हवी? जाणून घ्या!

अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका

हे एक विशेष प्रकारचे रेशन कार्ड आहे. सरकार हे कार्ड अत्यंत गरीब वर्गात समाविष्ट असलेल्या कुटुंबांना देते. म्हणजेच ज्या कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे नियमित उत्पन्न नाही अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकार हे कार्ड जारी करते. मजूर, वृद्ध आणि बेरोजगार या वर्गात येतात.

पांढरे रेशन कार्ड

जे कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि ज्यांना अनुदानित धान्याची गरज नाही अशा कुटुंबांना हे कार्ड देण्यात आले आहे. हे रेशन कार्ड बहुतेक ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून वापरले जाते. भारतातील कोणताही नागरिक हे रेशन कार्ड घेऊ शकतो. याचा वापर मुख्यत्वे रेशन मिळवण्यासाठी नाही तर आपली ओळख सिद्ध करण्यासाठी केला जातो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment