Son in law of Aamir Khan Nupur Shikhare : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि आयरा खानचा होणारा नवरा नुपूर शिखरे सध्या चर्चेत आहे. नूपुरने आमिर खानच्या मुलीला लग्नासाठी प्रपोज केलं आहे. दोघेही २०२० पासून एकमेकांना डेट करत होते. नुपूर हा अभिनेता नाही, पण तो नक्कीच चर्चेत आहे. तो सुष्मिता सेन आणि आमिर खानचा वैयक्तिक फिटनेस ट्रेनर आहे. आयरा खानला प्रपोज करण्यासोबतच नुपूर शिखरे आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.
आमिरच्या जावयानं केलंय न्यूड फोटोशूट
नुपूर शिखरेनं तीन वर्षांपूर्वी न्यूड फोटोशूट केलं होते. काही महिन्यांपूर्वी रणवीर सिंगनं असेच एक फोटोशूट केलं होतं, ज्यानंतर तो कायदेशीर गोष्टींमध्ये अडकताना दिसला. तो वादाच्या भोवऱ्यातही दिसला. नुपूरनं २०१९ मध्ये न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यानं रणवीर सिंगला मागे टाकले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
हेही वाचा – आमिर खानच्या लेकीचा साखरपुडा..! बॉयफ्रेंडनं सर्वांसमोर केलं प्रपोज; पाहा VIDEO
हेही वाचा – कोल्हापूरला ‘कोल्हापूर’ हे नाव कसं आणि का पडलं? जाणून घ्या…
कोण आहे नूपुर शिखरे?
नुपूर शिखरेच्या करिअरबद्दल सांगायचं तर, त्यानं फिटनेसिजमपासून सुरुवात केली. आजच्या काळात नुपूर शिखरेला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फिटनेस एक्स्पर्ट आणि कन्सल्टंट म्हणून ओळखलं जातं. आमिर खानला नुपूरनं प्रशिक्षण दिले होते. यादरम्यान आयरा खानही तिच्या फिटनेसने प्रेरित झाली आणि ट्रेनिंग घेऊ लागली. प्रशिक्षणादरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. दोघांनी दोन वर्षांचे लॉकडाउन लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये घालवले. आयरा खान अनेकदा नुपूर शिखरसोबत इंस्टाग्रामवर पोस्ट करताना दिसते. नुपूरने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली, असं आयरानं सांगितलं होतं.