PM Modi Selfie With Friend | कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या पहिल्या दौऱ्यावर आहेत. येथून मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक सेल्फी शेअर केला, जो चर्चेचा विषय बनला आहे. पुलवामाचा रहिवासी असलेल्या नझिमसोबत (Nazim Nazir) त्यांनी हा सेल्फी काढला. या पोस्टमध्ये मोदींनी लिहिले, “माझा मित्र नझिमसोबतचा एक संस्मरणीय सेल्फी. त्याच्या चांगल्या कामाने मी प्रभावित झालो. भेटीत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला भेटून आनंद झाला. त्यच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.” मोदींच्या या पोस्टनंतर हा नझिम कोण, ज्याला मोदींनी आपले मित्रही म्हटले? असा प्रश्न सर्वांच्या मनात आला आहे.
मोदींसोबत सेल्फी क्लिक करणारा नझिम विकसित भारत कार्यक्रमाचा लाभार्थी आहे. जम्मू-काश्मीर कार्यक्रमादरम्यान त्याने मोदींशी संवाद साधला. या संवादादरम्यान नझिमने मध विक्रेता म्हणून केलेल्या प्रवासाबद्दल मोदींना सांगितले. नझिमने 2018 साली घराच्या गच्चीवरून मध विक्रीचा हा प्रवास सुरू केला. ”त्यावेळी मी दहावीत होतो आणि त्याच दरम्यान मी मधमाशी पालन सुरू केले. यात आवड वाढल्याने मी मधमाशीपालनाबाबत अधिक ऑनलाइन रिसर्च करण्यास सुरुवात केली”, असे नझिमने सांगितले.
गेल्या वर्षी विकला पाच हजार किलो मध
नझिम म्हणाला, “2019 मध्ये मी सरकारकडे गेलो आणि मधमाशांच्या 25 पेट्यांसाठी 50 टक्के अनुदान मिळवले. यातून मी 75 किलो मध काढला. मी हे मध गावोगावी विकायला सुरुवात केली, त्यातून मला 60,000 रुपये मिळाले. 25 पेट्यांमधून मी 200 पेट्यांवर पोहोचलो आणि मग मी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मदत घेतली. या योजनेंतर्गत मला पाच लाख रुपये मिळाले आणि मी 2020 मध्ये माझी वेबसाइट सुरू केली. हळूहळू माझ्या मधाच्या ब्रँडला बरीच ओळख मिळाली आणि मी 2023 मध्येच पाच हजार किलो मध विकला.”
हेही वाचा – अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित व कलापिनी कोमकली राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित
आता या प्रवासात नझिमसोबत किमान 100 लोक काम करतात. आता नझिमला FPO (फॉलो ऑन पब्लिक ऑफर्स) देखील मिळाला आहे. कार्यक्रमादरम्यान नझिमशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना विचारले की, लहान असताना तुम्हाला काय बनायचे होते? यावर त्याने उत्तर दिले की त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, पण त्याला काहीतरी वेगळे करायचे आहे.मोदी म्हणाले, “तुमच्या कुटुंबाने तुमची क्षमता ओळखली आणि तुम्ही डॉक्टर होऊ शकला असता, पण तुम्ही तो मार्ग स्वीकारला नाही. असे करून तुम्ही काश्मीरची गोड क्रांती घडवून आणली आहे. हॅट्स ऑफ टू यू.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!