मुंबई : संजय दत्तचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमा आठवतोय का? त्या चित्रपटातील हिरो म्हणजेच ‘संजय दत्त’ प्रत्येकाला ‘जादू की झप्पी’ देतो, म्हणजे लोकांना मिठी मारतो जेणेकरून तो त्यांना काही काळ आनंद देऊ शकेल आणि त्यांना मानसिकदृष्ट्या बरे वाटेल. परंतु ब्रिटनमधील एका व्यक्तीनं त्या चित्रपटापासून प्रेरित होऊन एक अनोखा व्यवसाय उघडलाय. किंबहुना ‘मुन्नाभाई’प्रमाणेच या व्यक्तीनेही लोकांना ‘जादू की झप्पी’ देण्याचं काम सुरू केलं आहे. फरक एवढाच आहे की तो या कामाचे पैसे मोजतो.
माध्यमांच्या वृत्तानुसार, कॅनडामध्ये राहणारा ३० वर्षीय ट्रेवर हूटन (Trevor Hooton) इंग्लंडमध्ये ‘एम्ब्रेस कनेक्शन’ नावाचा व्यवसाय चालवतो. त्यानं काही महिन्यांपूर्वी ब्रिस्टल, इंग्लंडमध्ये हा व्यवसाय सेट केला. या व्यवसायांतर्गत तो ग्राहक म्हणून येणाऱ्या पैशांसाठी अनोळखी लोकांना मिठी मारतो. या कामासाठी तो खूप पैसे घेतो.
हूटन अशा लोकांना मदत करतो जो इतरांशी नातेसंबंध तयार करू शकत नाहीत किंवा नैराश्य, चिंता आणि एकाकीपणानं ग्रस्त आहेत. तो स्पर्शाच्या शक्तीने लोकांमध्ये प्रेमाची भावना जिवंत ठेवण्याचं काम करतो, परंतु अनेकांना त्याचं कार्य पूर्णपणे समजत नाही. हूटन हा व्यवसाय प्रौढ उद्योगाशी संबंधित असल्याचं मानतो, जे पूर्णपणे चुकीचं आहे.
हूटन किती पैसे घेतो?
हूटन म्हणाला, ”व्यावसायिक मिठी मारणं हे एक महत्त्वाचं आणि सन्माननीय काम आहे.” १० वर्षांपूर्वी हूटननं मानवी संबंधांवर संशोधन सुरू केलं. त्याला हे शास्त्र पूर्णपणे समजून घ्यायचं होतं. मात्र यावर्षी मे महिन्यात त्यानं हा व्यवसाय सुरू केला. एकटेपणाशी झगडत असलेल्या किंवा कोणाशीही सहज संबंध निर्माण करू न शकणाऱ्या लोकांवर तो या थेरपीद्वारे उपचार करतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तो एका तासाच्या सत्रासाठी सात हजार रुपये घेतो. त्याला प्रथम लोकांना बोलून त्यांना काय हवं आहे ते समजून घ्यावं लागतं आणि त्यानंतरच तो सेवा देतो. मिठी मारण्याव्यतिरिक्त, तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी कोचिंग, पेअर मसाज क्लासेस आणि एक्रो योगा सारख्या कला शिकवतो, ज्यासाठी तो ५ हजार रुपये ते ९ हजार रुपये आकारतो.