Kia Carens New Variant : किया इंडियाने रु. 17 लाख किंमतीत नवीन लक्झरी (O) व्हेरिएंट लॉन्च करून Carens MPV मॉडेल लाइनअपचा विस्तार केला आहे. हे नवीन व्हेरिएंट 7-सीटर मध्ये येते. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Kia Carens Luxury (O) व्हेरिएंटमध्ये मल्टी ड्राईव्ह मोड, इलेक्ट्रिक सनरूफ आणि अॅम्बियंट लाइटिंग येते. याशिवाय, लक्झरी ट्रिममध्ये आढळणारे सर्व फीचर्स यात येतात. किया इंडियाने 16.99 लाख (एक्स-शोरूम) किंमतीत नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे.
Kia Carens Luxury (O) प्रकारात वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4.2-इंच कलर MID, OTA अपडेटसह Kia Connect UI, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, एअर प्युरिफायर, टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील, सीट ट्रे अंतर्गत, फुल लेदरेट सीट्स, क्रूझ कंट्रोल, रिअर व्ह्यू कॅमेरा, 6-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री आणि गो, एलईडी हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल आणि एलईडी टेल लॅम्प मिळतात.
हेही वाचा – Hanuman Jayanti : हनुमान जयंती वर्षातून दोनदा का साजरी केली जाते? तुम्हाला कारण माहितीये?
The Kia Carens is here to inspire you and your family with its high-tech, extravagant design and sophistication like never before! After all, it’s all about calling those who are from a different world. #DesignedToInspire#KiaIndia #KiaCarens #FromADifferentWorld #ICOTY2023
— Kia India (@KiaInd) April 3, 2023
यामध्ये 6 एअरबॅग्ज, हिल स्टार्ट आणि डिसेंट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग सेन्सर्स, ब्रेक असिस्ट सिस्टम, ऑल व्हील डिस्क ब्रेक्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश आहे. नवीन Kia Carens Luxury (O) प्रकारात 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5L डिझेल इंजिन पर्यायासह आणण्यात आले आहे.
पेट्रोल इंजिन युनिट 253Nm सोबत 160bhp तर डिझेल इंजिन युनिट 115bhp आणि 250Nm टॉर्क निर्माण करते. यात 6-स्पीड iMT, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक (केवळ डिझेल) आणि 7-स्पीड DCT ऑटोमॅटिकचा पर्याय आहे.