देशातील मोठी दुर्घटना! केरळमध्ये भूस्खलन, शेकडो लोक अडकले, 24 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

Kerala Wayanad Landslide : मंगळवारी पहाटे केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील अनेक डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंडकाई आणि चुरलमला येथे दोन मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. चुरलमला शहरात शेकडो घरे, वाहने आणि दुकाने पाण्यात बुडाली. मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर शेकडो लोक अजूनही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी तैनात बचाव पथकाने सांगितले की, संततधार पावसामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पीएमओ कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) ने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा – Paris 2024 Olympics : जेव्हा आख्खा भारत झोपला होता, तेव्हा मनिका बत्रानं रचला इतिहास!

लष्कर मदतीला

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) ने सांगितले की, अग्निशमन आणि NDRF च्या टीम्स बाधित भागात तैनात करण्यात आल्या आहेत, सोबत अतिरिक्त NDRF टीम कन्नूरला पाठवण्यात आली आहे, KSDMA ने फेसबुकवर केलेल्या पोस्टनुसार संरक्षण सुरक्षा कॉर्प्सच्या दोन टीम आहेत तसेच बचाव कार्यात मदत करण्यासाठी वायनाडला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नेपाळी जोडप्याच्या मुलाचा मृत्यू

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वायनाड जिल्ह्यातील थोंडरनाड गावात शेतात काम करणाऱ्या एका नेपाळी जोडप्याच्या एका वर्षाच्या मुलाचा भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर पडलेला मलबा यामुळे बचावकार्यात अडचण निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या भागातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, टीम जिल्ह्यात पोहोचताच, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) जवान या भागात तैनात करण्यात आले आहेत आणि रस्ता संपर्क पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment