

Kerala Family photo with dead woman : अंत्यसंस्कार हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात कोणती दृश्य येतात? लोक रडत असतात, काही शांत असतात. निधन झालेल्या व्यक्तीच्या आठवणी लोक काढत अससतात. पण अंत्यसंस्कार करताना कधी कुणाला हसताना पाहिलं आहे का? सध्या केरळमधील एका कुटुंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे, कारण त्यांनी त्यांच्या कुटुंबातील एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराच्या वेळी फोटोसाठी हसताना पोज दिला. आता हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
कुठला आहे हा फोटो?
टाइम्स ऑफ इंडिया वेबसाइटच्या वृत्तानुसार, पनवेलिल कुटुंब पठाणथिट्टा जिल्ह्यातील मालापल्ली गावात राहते. या कुटुंबावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. याचं कारण म्हणजे त्यांचा व्हायरल होत असलेला एक फोटो, ज्यामध्ये ते सर्व हसताना दिसत आहेत. हसत असलेल्या लोकांच्या चित्रांमध्ये काय चूक आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक, जेव्हा तुम्ही चित्र काळजीपूर्वक पहाल तेव्हा तुम्हाला कळेल की मध्यभागी एक पारदर्शक शवपेटी ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये मरियम्मा नावाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह आहे आणि १७ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.
New style of family photo in Kerala!! pic.twitter.com/q1GkgFmNS2
— Ambika JK (@JKAmbika) August 22, 2022
हेही वाचा – हवालदारासाठी ७००, सब इन्स्पेक्टरसाठी १८७० रुपये…; ‘इथं’ पोलीस भाड्यानं मिळतात!
मरियम्मा ९५ वर्षांच्या होत्या आणि वृद्धापकाळ आणि शारीरिक समस्यांमुळं त्यांचं निधन झालं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्यांना ९ मुले आणि १९ नातवंडे होती जी जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात राहत होती, परंतु त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी कुटुंबातील काही सदस्य त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यानं सांगितलं, की ते व्हायरल करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. उलट मरियम्मा यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवून सर्वांना आनंद झाला. आजीचा चांगला काळ त्यांनी स्मरणात ठेवावा, म्हणजे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळेल, असा त्यांचा विश्वास होता.
केरळचे शिक्षण मंत्री म्हणाले..
आनंदानं निरोप देता येतो, ही गोष्ट सहन न होणाऱ्या लोकांना हा फोटो त्रासदायक ठरेल, असं कुटुंबातील एका सदस्यानं सांगितलं. केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनीही या कुटुंबाची पाठराखण केली आहे. त्यांनी फेसबुकवर म्हटलं, आहे की मृत्यू वेदनादायक आहे परंतु एखाद्याला हसत हसत निरोप देणं ही चांगली गोष्ट आहे जेणेकरून ते त्यांचे आयुष्य हसत हसत घालवू शकतील.