KBCच्या मंचावर हे काय घडलं..! ‘उघड्या’ स्पर्धकाला पाहून अमिताभही चक्रावले; पाहा VIDEO

WhatsApp Group

Kaun Banega Crorepati 14 : ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या कार्यक्रमात येण्यासाठी अनेक लोक वर्षानुवर्षे वाट पाहत आहेत. हॉटसीटसाठी त्यांचा नंबर लागला की त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. असंच काहीसं घडलं आहे. पहिल्या फेरीत ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’मध्ये विजय मिळवल्यानंतर विजय गुप्ता नावाच्या स्पर्धकानं आनंदात शर्ट काढला आणि संपूर्ण स्टेजवर उघडा फिरला. हे सर्व पाहून शोचे होस्ट अमिताभ बच्चन आश्चर्यचकित झाले.

टीव्हीवरील प्रसिद्ध क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ लोकांना खूप आवडतो. प्रथम या सेटवर पोहोचणं आणि नंतर अनेक स्पर्धकांमध्ये ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ राऊंडमध्ये जिंकणं आणि अमिताभ बच्चन हॉटसीटवर पोहोचणं, असे टप्पे असतात. या सीटवर पोहोचताना अनेकदा लोक भावूक होताना, रडताना, नाचताना दिसतात आहेत, पण आजपर्यंत कोणीही शर्ट काढून हवेत फिरताना दिसलं नाही. पण एका स्पर्धकानं या स्टाईलनं अमिताभसह सर्वांनाच चकित केलं.

हेही वाचा – चेष्टा आहे का..! ‘या’ गावातील प्रत्येक घरात सरकारी नोकरी आहे; एकदा वाचाच!

कोण होता तो स्पर्धक?

अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटसाठी विजय गुप्ता नावाच्या स्पर्धकाचं नाव घेताच ते इतके खूश झाले, की गुप्ता यांनी त्यांचं शर्ट काढलं आणि पूर्ण स्टेजला फेरी मारली, ते प्रेक्षकांच्या दिशेनेही पोहोचले आणि शर्ट काढून हवेत फेकलं. अमिताभ बच्चन गुप्ता यांना पाहतच बसले. बच्चन त्यांना म्हणाले, ”भाई, कृपया शर्ट घाला. बाकीचे कपडे उतरतील, ही आम्हाला भीती आहे.” बिग बींच्या या उत्तरानंतर तिथं बसलेले लोक हसायला लागले. विजय गुप्ता शर्ट घाललण्यासाठी स्टेजच्या पाठीमागे गेले. तेव्हा त्यांच्यापाठोपाठ अमिताभही गेले. या खेळात गुप्ता काही खास कामगिरी करू शकले नाहीत आणि त्यांनी केवळ १० हजार रुपये जिंकले.

हेही वाचा – “आम्हाला ‘तगडा’ साथीदार मिळालाय”, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आलेली ‘संभाजी ब्रिगेड’ काय आहे?

काय होता तो प्रश्न, जो गुप्ता यांना अवघड गेला?

विजय गुप्ता सुरुवातीला चांगले खेळले, पण त्यांना ४० हजाराच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. “हिंदू पौराणिक कथेनुसार रावणानं पुष्पक विमान बळजबरीनं कोणाकडून घेतलं होतं?” इंद्र, कुबेर, जटायू, माया, असे चार पर्याय होते. या प्रश्नाचं उत्तर गुप्ता यांना माहीत नव्हतं. त्यांनी धोका पत्करण्यापूर्वी ५०:५० लाइफलाइन घेतली. तरीही उत्तर देता आलं नाही. यानंतर त्यांनी ‘व्हिडिओ कॉल अ फ्रेंड’ लाइफलाइनचा वापर केला. त्याचा मित्र महेंद्र याला इंद्र उत्तर दिलं. हे चुकीचे उत्तर होतं. यामुळे विजय गुप्ता यांचं नुकसान झालं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment