देशात प्रथमच 98 जणांना एकसाथ जन्मठेप! जाणून घ्या कारण

WhatsApp Group

Karnataka 98 People Life Imprisonment Case : दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयाने सामूहिकरीत्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची देशाच्या इतिहासातील ही कदाचित पहिलीच वेळ आहे. कर्नाटक राज्याच्या सत्र न्यायालयाने एकाच वेळी 98 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2014 च्या भेदभाव आणि जातीय हिंसाचाराच्या या प्रकरणात सत्र न्यायालयाने अन्य तिघांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे 10 वर्षे जुने प्रकरण गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावाशी संबंधित आहे, जिथे लक्ष्यित हल्ला आणि दलितांविरुद्ध भेदभावाचे प्रकरण समोर आले.

न्यायाधीश चंद्रशेखर सी यांनी भेदभाव आणि जातीय हिंसाचार प्रकरणात एकूण 101 जणांना दोषी ठरवले होते. यापैकी 3 जणांना कमी शिक्षा देण्यात आली. कारण त्या तिघांवर एससी-एसटी कायदा 1989 लागू होऊ शकला नाही. हे तिघेही दलित समाजातील आहेत. दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात एवढ्या लोकांना एकत्रित म्हणजे सामूहिक शिक्षा सुनावण्याची देशातील ही पहिलीच वेळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – जेट विमानाचे इंजिन किती CC चे असते? त्याचे मायलेज किती?

सरकारी वकील अपर्णा बुंदी यांनी सांगितले की, या प्रकरणी 117 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून खटला चालवण्यात आला आहे. 29 ऑगस्ट 2014 रोजी पोलिसात तक्रार करण्यात आली. या तक्रारीत दलितांवरील अत्याचार, त्यांच्या घरांना आग लावण्याबाबत माहिती देण्यात आली होती. या हिंसाचारानंतर 3 महिन्यांपासून मराकुंबी गावात पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली होती. याप्रश्नी कर्नाटक राज्य दलित हक्क समितीने आंदोलन केले होते. यानंतर गंगावती पोलीस ठाणे अनेक दिवस सील करण्यात आले होते.

या प्रकरणाच्या आरोपपत्रात समाविष्ट असलेल्या 16 जणांचा या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. सर्व दोषींना बेल्लारी कारागृहात ठेवण्यात आले असून त्यांच्याकडून 5,000 ते 2,000 रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment