Menstrual Leave : खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी कर्नाटक सरकार एक आनंदाची बातमी देणार आहे. आता कर्नाटकात मासिक सुट्टी दिली जाणार आहे. महिलांना वर्षभरात सहा मासिक रजा मिळणार आहेत. मासिक पाळीच्या रजा आणि मासिक पाळीची आरोग्य उत्पादने मोफत मिळण्याच्या अधिकारावर विधेयक तयार करण्यासाठी सरकारने 18 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये महिलांना सहा सशुल्क सुट्ट्या मिळतील, म्हणजेच यासाठी कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत, असे म्हटले आहे.
कामगार सचिव मोहम्मद मोहसीन यांनी सांगितले की, ‘डॉ. सपना मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम तयार करण्यात आली होती, ज्याने सरकारला अहवाल सादर केला आहे. तो पुढील वेळी संमतीसाठी विधानसभेसमोर ठेवला जाईल. कर्नाटक हे पाऊल खासगी क्षेत्रासाठी प्रथम सुरू करण्याचा विचार करत आहे आणि धोरण तयार झाल्यानंतर ते सरकारी विभागांमध्ये अनिवार्य करेल.’
मोहसीन म्हणाले की, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने आहे ज्यात या विषयावर धोरण बनवण्याची गरज आहे. या वर्षी जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीतील रजेबाबत आदर्श धोरण तयार करण्यास सांगितले होते.
या प्रकरणी कर्नाटकचे कामगार मंत्री म्हणाले, ‘आम्ही सूचनांवर विचार करत असून समितीच्या सदस्यांसोबत बैठक बोलावली आहे. हा उपक्रम महिला कर्मचाऱ्यांना आधार देतो कारण महिलांना जीवनात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. महिलांना ही रजा घ्यायची असेल तेव्हा निवडता येईल. वर्षभरात महिला फक्त सहा सुट्ट्या घेऊ शकतात. लग्नानंतर किंवा मुले झाल्यावर महिलांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.’
गेल्या महिन्यात ओडिशा सरकारने महिलांसाठी एक दिवसाची रजा जाहीर केली होती. 1992 मध्ये बिहारमध्ये महिलांना मासिक दोन दिवसांच्या पगारासह मासिक रजा देण्यास सुरुवात झाली. केरळ 2023 मध्ये सर्व राज्य विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींना मासिक सुट्टी देण्यास सुरुवात केली होती.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!