Car Accident Video In Karnataka : कर्नाटकातील मंगळुरू येथे एक हृदयद्रावक घडली आहे. लेडीहिल परिसराजवळ बुधवारी झालेल्या अपघातात एक कार रस्त्याच्या कडेला जाऊन फूटपाथवर गेली. या घटनेत फूटपाथवरून चालणाऱ्या लोकांना जोरदार धडक बसली, यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
वृत्तानुसार, घटनेदरम्यान महिला आरडाओरडा करत होत्या, परंतु चालकाने कार त्यांच्यावर चालवून पळ काढला. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेदरम्यान ही महिला रस्त्याने चालत असताना कमलेश बलदेव याने महिलां मागून धडक दिली. कारने प्रथम तीन-चार महिलांना धडक दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही टक्कर इतकी भीषण होती की महिला हवेत उडाल्या. यानंतर कारने पुढे जाऊन आणि आणखी दोघांना चिरडले.
हेही वाचा – 70,000 रुपये पगार आणि 10 वर्षे नोकरी…तर तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळेल?
आश्चर्याची बाब म्हणजे कमलेश थांबला नाही तर पळून जाण्यापूर्वी सर्वांच्या अंगावर गाडी पळवली. 23 वर्षीय रूपश्री असे मृत महिलेचे नाव आहे. जखमी झालेल्या चार जणांपैकी ती एक होती, तर इतर तीन अल्पवयीन आहेत. अपघातानंतर (Car Accident) कमलेशने कार एका कार शोरूमजवळ सोडून घराकडे धाव घेतली.
घटनेनंतर, पोलिसांनी कमलेश विरुद्ध कलम 279, 337, 338 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 304 (A) नुसार नोंद करण्यात आली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!