नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. 2024 मध्ये नोकऱ्यांबाबत (Jobs In 2024) सुधारणा होण्याची चिन्हे आहेत आणि तज्ञांना वाटते की नोकरी शोधणाऱ्यांना या वर्षी अनेक चांगल्या संधी मिळतील. डिसेंबर 2023 मध्ये भरतीमध्ये 2 टक्के वाढ झाली आहे, त्यानंतर 2024 मध्ये भरतीमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या वर्षी जॉब मार्केटमध्ये 8.3 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. फाउंडइटच्या वार्षिक ट्रेंड रिपोर्टनुसार, 2024 मध्ये नोकऱ्यांमध्ये 8.3 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
FoundIt वार्षिक ट्रेंडचा विश्वास आहे, की नोकऱ्यांच्या बाबतीत सर्वाधिक रिक्त जागा बंगळुरूमध्ये दिसून येतील. भारतातील आयटी हबमध्ये नोकरी शोधणाऱ्या किंवा करिअर बदलू इच्छिणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले असणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग, बीएफएसई, ऑटोमोटिव्ह, रिटेल आणि ट्रॅव्हल टूरिझम क्षेत्रात जास्तीत जास्त भरती दिसू शकते.
हे वर्ष 2023 पेक्षा चांगले
FoundIt Inside Tracker (FIT) च्या आकडेवारीनुसार, 2023 हे वर्ष नोकऱ्यांच्या बाबतीत चांगले राहिले नाही. 2022 च्या तुलनेत गेल्या वर्षी हायरिंग अॅक्टिव्हिटी 5 टक्क्यांनी कमी होती त्यामुळे नोकऱ्या सोडून नवीन नोकऱ्या मिळण्याची परिस्थिती स्थिर झाली आहे. मात्र, डिसेंबरमध्ये हायरिंग इंडेक्समध्ये 2 टक्क्यांची सुधारणा झाली, हे चांगले लक्षण आहे. 2024 हे वर्ष या दृष्टीने चांगले वर्ष असणार आहे कारण या वर्षी आपण नोकऱ्यांमध्ये 8.3 टक्क्यांपर्यंत वाढ पाहू शकतो.
हेही वाचा – नोकरी सोडून स्वत: चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच!
या क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ
अहवालानुसार, सागरी आणि जहाजबांधणी उद्योगात भरतीमध्ये 28 टक्के वाढ दिसून आली आहे. रिटेल, ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रांमध्येही 25 टक्के वाढ झाली आहे, तर अडव्हर्टाइझिंग, मार्केट रिसर्च आणि पब्लिक रिलेशन 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षीही मॅन्युफॅक्चरिंग, ट्रॅव्हल टुरिझम या क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. एकूणच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शोध घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!