

Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा संघ 12 जानेवारीपर्यंत जाहीर केला जाणार आहे. पण, त्यात जसप्रीत बुमराहचं नाव असेल का, हा मोठा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार? त्याच्या दुखापतीबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट न झाल्याने हा प्रश्न आता अधिक गडद झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचे खेळणे किंवा न खेळणे हे त्याच्या दुखापतीच्या स्थितीवर अवलंबून असेल. सिडनी कसोटीदरम्यान जसप्रीत बुमराहच्या पाठीत जडपणा आला होता, त्यानंतर त्याला खेळ अर्धवट सोडून मैदान सोडावे लागले आणि तो परतही आला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला 20 फेब्रुवारीला पहिला सामना खेळायचा आहे. पण, तोपर्यंत बुमराह फिट होईल का, हा मोठा प्रश्न आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, टीम मॅनेजमेंटच्या म्हणण्याप्रमाणे, जर हा पाठीचा त्रास असेल तर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तंदुरुस्त असेल. पण, सोशल मीडियावर फिरत असलेल्या इतर काही रिपोर्ट्सनुसार, जर तो ग्रेड 1 ची दुखापत असेल तर त्याला काही काळ संघाबाहेर राहावे लागेल.
हेही वाचा – महाराष्ट्रात अजब आजार, 3 दिवसात पडतंय टक्कल; गावांमध्ये भीतीचे वातावरण!
बुमराहसारख्या दुखापतींशी झुंजलेल्या माजी भारतीय गोलंदाजाने सांगितले की, दुखापतीच्या अंतिम तपासणीवर सर्व काही अवलंबून असेल. जर स्ट्रेस फ्रॅक्चर नसेल तर बुमराह जानेवारीच्या अखेरीस मैदानात परतेल. याचाच अर्थ तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे.
आता बुमराह कधी मैदानात उतरणार हे पाहणे बाकी आहे. तो इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळणार नाही हे नक्की. पण, तो चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकणार का? आणि, जर तो 6 महिने बाहेर असेल तर तो आयपीएल 2025 मध्ये खेळेल की नाही? चाहत्यांना त्याचे पुनरागमन फक्त इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळेल का? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे येत्या काही दिवसांत अधिकृतपणे पाहायला मिळतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!