VIDEO : जपानी कपल भारतात आलंय, फक्त रजनीकांतचा सिनेमा पाहायला!

WhatsApp Group

Rajinikanth’s Jailer Film : चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्ससाठी खूप वेडे असतात. अनेकजण काहीही करायला तयार असतात. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. त्याचबरोबर त्यांचे परदेशातही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याच दोन वर्षांनंतर आज 10 ऑगस्टला रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण होत आहे. काही लोक फटाके फोडून आणि काही सुपरस्टारच्या पोस्टरवर फुलांच्या पाकळ्या टाकून आनंद साजरा करत आहेत. या सगळ्यात एका जपानी जोडप्याने आपण रजनीकांतचे खरे चाहते असल्याचे सिद्ध केले आहे.

रजनीकांतचा ‘जेलर’ चित्रपटगृहांमध्ये सकारात्मक प्रतिसादांसह प्रदर्शित झाला आहे. चाहते चित्रपटावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या सगळ्यात जपानच्या ओसाका येथील नागरिक यासुदा हिदेतोशी आणि त्यांची पत्नी रजनीकांत यांचा जेलर चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचले. एका मुलाखतीदरम्यान यासुदा हिदेतोशी म्हणाली, “जेलर हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही जपानहून चेन्नईला आलो आहोत.” सध्या या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘या’ तारखेला मिळणार भारत-पाक वर्ल्डकप मॅचची तिकीटे, जाणून घ्या डिटेल्स!

वृत्तसंस्था पीटीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये जपानी जोडप्याने इतर चाहत्यांसह रजनीकांतचा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. रजनीकांतच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक असलेल्या यासुदा हिदेतोशीने तामिळ भाषेत माध्यमांशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला.

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’ या चित्रपटाद्वारे रजनीकांत यांनी दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार यांचाही चित्रपटात कॅमिओ आहे. जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना, विनायकन आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जेलरचे म्युझिक अनिरुद्ध रविचंदरने केले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment