ITR Filing Deadline : तुम्ही अद्याप आर्थिक वर्ष 2023-24 साठी ITR भरला नसेल, तर आज शेवटचा दिवस आहे. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये विलंब झाल्यास, तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड टाळायचा असेल तर तुम्ही मध्यरात्री 12 पर्यंत तुमचे रिटर्न भरू शकता. 2023-24 साठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (AIFTP) ने CBDT आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. पण शेवटची तारीख वाढवली नाही तर 31 ऑगस्टनंतर रिटर्न भरल्यास किती दंड भरावा लागेल ते जाणून घ्या.
आयकर रिटर्न न भरल्यास, तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो आणि कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ITR भरून तुम्ही भविष्यात कोणत्याही प्रकारची गुंतागुंत टाळू शकता. ज्या लोकांचे करपात्र उत्पन्न आयकर सवलत मर्यादेपेक्षा कमी आहे आणि ते फक्त परतावा मिळविण्यासाठी ITR दाखल करतात. उशिरा रिटर्न भरण्यासाठी अशा लोकांना कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागत नाही.
हेही वाचा – पाकिस्तानच्या ‘इंटरनॅशनल’ भिकाऱ्याकडे सापडले 5 लाख रुपये!
करदात्यांना आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी असल्यास उशीरा ITR फाइलिंगसाठी कमाल दंड 1,000 रुपयांपर्यंत मर्यादित आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या व्यक्तींना रिटर्न उशीरा भरल्याबद्दल 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. या कारणास्तव, आयकर विभाग लोकांना वेळेवर आयटीआर भरण्याची वारंवार आठवण करून देत असतो.
आयटीआर भरण्यास उशीर झाल्यास आयकर विभागाकडून दंड आकारला जातो. पण हा दंड तुमच्या उत्पन्नानुसार बदलतो. आयकराच्या कक्षेत येणाऱ्या किंवा नसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आयटीआर भरणे खूप महत्त्वाचे आहे. हे दर्शवते की गेल्या आर्थिक वर्षात तुम्ही एकूण किती उत्पन्न कमावले आहे? वेळेवर आयटीआर भरणे तुमच्यासाठी अनेक बाबतीत चांगले आहे.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!