Alert : ३१ डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा, नाहीतर बसेल १०,००० रुपयांचा फटका! तुम्ही केलंय का?

WhatsApp Group

ITR Filing Alert : जे करदाते काही कारणास्तव ३१ जुलै २०२२ पर्यंत आयटीआर (ITR) दाखल करू शकले नाहीत, त्यांना सरकारने आणखी एक संधी दिली आहे. ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत त्यांचा ITR भरू शकतात. मात्र, यासाठी त्यांना आता ५००० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. तरीही त्यांनी आयटीआर भरला नाही तर पुढील वर्षी ही फी दुप्पट म्हणजेच १०,००० रुपये होईल. लक्षात ठेवा की यामध्ये ते लोक समाविष्ट नाहीत ज्यांचे ITR ऑडिट आवश्यक आहे. ज्यांचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा लोकांसाठीही यामध्ये काहीसा दिलासा आहे.

आरएसएम इंडियाचे संस्थापक डॉ. सुरेश सुराणा म्हणतात की ज्यांचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, त्यांच्यासाठी विलंब शुल्क देखील केवळ १००० रुपयांपर्यंत मर्यादित असेल. लक्षणीय बाब म्हणजे, ITR उशीरा भरल्यास केवळ विलंब शुल्कच नाही तर करावर व्याजही भरावे लागते. हे व्याज मासिक आधारावर आकारले जाते. आयटी कायद्यानुसार, कराच्या रकमेवर १% पर्यंत व्याज आकारले जाऊ शकते.

हेही वाचा – तुम्हालाही होईल आनंद..! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांची ‘नवी’ घोषणा; वाचा!

ITR दाखल न केल्यास काय होईल?

सुरेश सुराणा स्पष्ट करतात की जर आयकरदात्याने वेळेत ITR दाखल केला नाही तर, आयकर विभागाला करदात्यावर नोंद न केलेल्या उत्पन्नाच्या ५०% इतका दंड आकारण्याचा अधिकार आहे. जर विभागाला वाटत असेल की ITR हेतुपुरस्सर दाखल केला गेला नाही, तर डिफॉल्टरला ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. जर करचुकवेगिरीची रक्कम २५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर ३ महिने ते २ वर्षांच्या आत तुरुंगवास होईल.

पॅन-आधार लिंक

आयटीआर भरण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे केले नसेल तर तुम्ही ITR दाखल करू शकणार नाही. आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीखही निघून गेली आहे, त्यामुळे तुम्ही आता हे काम केल्यास तुम्हाला यासाठी १००० रुपये दंडही भरावा लागेल. तुम्ही आयकर वेबसाइटवर आयकर रिटर्न भरण्यासोबतच पॅनला आधारशी लिंक करण्याचे कामही पूर्ण करू शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment