ISRO Recruitment 2023 : इस्रोमध्ये नोकरीची संधी..! पगार 69000 रुपये; वाचा डिटेल्स

WhatsApp Group

ISRO Recruitment 2023 : इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने तंत्रज्ञ-ए, ड्राफ्ट्समन-बी आणि रेडिओग्राफर-ए ची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट vssc.gov.in किंवा isro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 4 मे पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 मे आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 49 पदे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांवर नोकरी करायची आहे, त्यांनी खालील गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

पदांची संख्या

49 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे, त्यापैकी 43 रिक्त पदे तंत्रज्ञ-ए पदासाठी, 5 रिक्त जागा ड्रॉफ्ट्समन-बी पदासाठी आणि 1 रिक्त जागा रेडिओग्राफर पदासाठी आहे.

तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – ४ मे
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे

हेही वाचा – Instant Pan Card : घरबसल्या काही मिनिटात बनवा पॅन कार्ड, तेही फ्री..! वाचा प्रोसेस

अर्ज शुल्क

  • यूआर / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी – रु. 100/-
  • SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- शून्य

पगार

  • तंत्रज्ञ-बी- स्तर 03, रु. 21700 ते रु. 69100
  • ड्राफ्ट्समन-बी- लेव्हल 03, रु .21700 ते रु.69100
  • रेडिओग्राफर-ए- लेव्हल 04, रु. 25500 ते रु. 81100

वयोमर्यादा

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा 35 वर्षे असावी.

नोटिफिकेशन आणि अर्ज भरण्याची लिंक

ISRO Recruitment 2023 नोटिफिकेशन
ISRO Recruitment 2023 अर्ज भरण्याची लिंक

पात्रता निकष

उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10 वी पास असणे आवश्यक आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment