Success Story : 4 ते 5 लाखाचा पगार होता, तरीही नोकरी सोडली, IPS बनली!

WhatsApp Group

Success Story : ‘ब्रेन ड्रेन’ हा विषय भारतात खूप दिवसांपासून चर्चेत आहे. भारतात शिकून तरुण परदेशात जातात, असे अनेकदा सांगितले जाते. पण असे अनेक तरुण आहेत जे परदेशात लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून देशसेवेसाठी परततात. अंजली विश्वकर्मा त्यापैकीच एक. अंजली विश्वकर्मा 2021 बॅचच्या IPS आहेत. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्या सध्या झाशी जिल्ह्यातील बारूसागर पोलीस ठाण्यात पोलीस स्टेशन प्रमुख म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये जन्मलेल्या अंजली यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण डेहराडूनमध्ये केले. यानंतर त्या B.Tech करण्यासाठी IIT कानपूरमध्ये गेल्या. त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग निवडली आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना एका तेल कंपनीत नोकरी मिळाली. तेल कंपनीत नोकरीच्या काळात त्यांचा पगार दरमहा 4 ते 5 लाख रुपये होता. त्यांचे प्रशिक्षण UAE मध्ये झाले. त्यानंतर नॉर्वे, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, न्यूझीलंड यांसारख्या देशांत कामाच्या निमित्ताने त्या येत-जात राहिल्या. देश आणि जगाचा प्रवास करूनही त्यांचे मन केवळ भारताशीच जोडले गेले.

न्यूझीलंडमधील नोकरीच्या काळातच त्यांनी ठरवले की त्या भारतात परततील आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करतील. यासोबतच तयारीदरम्यानच्या खर्चाची जबाबदारी त्या स्वत: उचलणार असल्याचेही ठरले. मग UPSC च्या तयारीसाठी सर्व पैसे वाचवल्यावर त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली.

हेही वाचा – खूप वेळ एकाच जागी बसल्याने वाढतो ‘या’ आजारांचा धोका! जाणून घ्या

परत आल्यानंतर त्यांनी तयारी सुरू केली आणि भूगोल हा विषय निवडला. 2019 मध्ये त्यांनी पहिला प्रयत्न केला पण यश मिळाले नाही. 2020 मध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी त्यांची आयपीएस आणि भारतीय वन सेवेसाठी निवड झाली. पण, त्यांनी आयपीएसची निवड केली.

अंजली सांगतात, की त्यांना नेहमी वाचनाची आणि काहीतरी नवीन शिकण्याची आवड आहे. त्या जे काही काम करू लागतात, त्यात त्यांना परफेक्ट व्हायचे असते. त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि निवड झाल्यानंतर आता त्या आपल्या नोकरीत समाधानी आहेत.

काही काळापूर्वी अंजली ड्रम वाजवायला शिकल्या. त्यात त्या पूर्णपणे पारंगत झाल्यावर आता काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहेत. त्यांना जीवनात विविधता आणि आव्हाने आवडतात. आयपीएस म्हणूनही त्या आव्हानांना पूर्ण धैर्याने सामोरे जातात. ”माझा कोणी रोल मॉडेल नाही, मी मित्रासोबत तयारी करत होते आणि त्यांच्याकडूनच त्यांना प्रेरणा मिळत राहिली”, असेही त्या म्हणाल्या.

अंजली लहानपणापासून क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या. अभ्यासासोबतच त्या इतर कामांमध्येही सक्रिय सहभाग घेत असत. यामुळे आयपीएस झाल्यानंतरही त्या अनेक प्रकारची कामे करतात. ”ज्या तरुणांना यूपीएससी परीक्षेची तयारी करायची आहे. त्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्या दिशेने काम केले पाहिजे. सोशल मीडिया आणि पुस्तके यांच्यात समतोल राखणे आवश्यक आहे. तुमचे प्राधान्यक्रम तुम्हीच ठरवायचे आहेत”, असा संदेश त्या तरुणांना देतात.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment