New RCB Captain : रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार!

WhatsApp Group

Rajat Patidar : आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार कोण असेल? या प्रश्नावरील पडदा आता उठला आहे. विराट कोहली कर्णधारपद भूषवेल की दुसरा कोणी, याचे उत्तर आता सापडले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी आपला नवीन कर्णधार जाहीर केला आहे. रजत पाटीदार आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार असेल.

रजत पाटीदार आरसीबीचा आठवा कर्णधार

रजत पाटीदार हा आरसीबीचा कार्यभार स्वीकारणारा आठवा खेळाडू असेल. त्याच्या आधी केविन पीटरसन, अनिल कुंबळे, डॅनियल व्हेटोरी, विराट कोहली, शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस यासारख्या मोठ्या नावांनी या संघाचे नेतृत्व केले आहे. आरसीबीचा कर्णधार बनल्यानंतर विराट कोहलीनेही रजत पाटीदारचे अभिनंदन केले आहे.

आयपीएलमध्ये आरसीबीची कामगिरी

आयपीएलमधील आरसीबीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, लीगमधील अशा संघांपैकी एक आहे ज्यांनी आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या १७ हंगामात ९ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला, त्यापैकी ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचला. पण, कधीही जेतेपद जिंकू शकलो नाही. आरसीबीने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा आरसीबी हा चौथा संघ आहे. त्याने आतापर्यंत एकूण १२३ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – भारतीय गायीला ४० कोटी रुपयांची बोली, जगभरातून लोकांची पसंती!

नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने राखलेल्या तीन खेळाडूंपैकी ३१ वर्षीय पाटीदार हा एक होता. आयपीएलमध्ये हा त्याचा पहिलाच कर्णधारपदाचा कार्यकाळ असला तरी, तो २०२४-२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामात मध्य प्रदेश राज्य संघाचे नेतृत्व केले. ही स्पर्धा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून त्याचा पहिला पूर्ण कार्यकाळ होता.

तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, जिथे त्याने नऊ डावांमध्ये ६१.१४ च्या सरासरीने आणि १८६.०८ च्या स्ट्राईक रेटने ४२८ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ५६.५० च्या सरासरीने आणि १०७.१० च्या स्ट्राईक रेटने २२६ धावा केल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment