

IPL 2024 SRH vs LSG : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्ये पुन्हा एकदा मोठा विजय नोंदवला आणि विक्रमांची रांग लावली. हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळलेला सामना 10 गडी राखून जिंकला. लखनऊ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात हैदराबादने एकही विकेट न गमावता 9.4 षटकांत विजय मिळवला. या विजयाचे नायक सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे होते, ज्यांनी स्फोटक शैलीत अर्धशतक ठोकले.
सर्वप्रथम ट्रॅव्हिस हेडने 16 चेंडूत अर्धशतक केले. यानंतर अभिषेकने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांनी 58 चेंडूत 167 धावांची नाबाद भागीदारी केली. दुसरीकडे, लखनऊ संघाच्या एकाही गोलंदाजाला हेड आणि अभिषेकवर नियंत्रण ठेवता आले नाही.
हेही वाचा –मुंबईतील शताब्दी रुग्णालयाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार
हा सामना 62 चेंडू शिल्लक असताना जिंकल्याने हैदराबाद संघाचा निव्वळ धावगती 0.406 झाला आहे. यासह हा संघ आता चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आता 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, लखनऊने 12 पैकी केवळ 6 सामने जिंकले आहेत. तो अजूनही सहाव्या क्रमांकावर कायम आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर होणारा पहिला संघ ठरला आहे.
लखनऊचा संघ 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये दाखल झाला आहे. त्याचा हा फक्त तिसरा सीझन आहे. लखनऊ आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत फक्त 4 सामने झाले आहेत. यात लखनऊ संघाने तीन सामने जिंकले आहेत. तर हैदराबाद संघाने लखनऊविरुद्ध विजयाची चव चाखण्याची ही पहिलीच वेळ आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा