WHAT. A. BALL! जसप्रीत बुमराहचा जबरदस्त यॉर्कर; पंजाबच्या बॅटरचे स्टम्प्स उद्ध्वस्त! पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 PBKS vs MI : जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी अशी ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात बुमराहरने भेदक गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्याच षटकात पंजाबच्या दोन फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. बुमराहने आधी पंजाबच्या रायली रुसोची दांडी गूल केली, तर षटकातील शेवटच्या चेंडूवर कप्तान सॅम करनला यष्टीपाठी झेलबाद केले.

या सामन्यात पंजाब संघाचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवच्या 78 धावांच्या जोरावर मुंबई संघाने 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या आहेत. मुंबईकडून रोहित शर्माने 36 धावांची खेळी केली. यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितशिवाय तिलक वर्माने 2 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 34 धावा केल्या. पंजाबकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर सॅम करनला 2 विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – IPL 2024 PBKS Vs MI : मुंबई इंडियन्सचे पंजाबला 193 धावांचे आव्हान! सूर्यकुमार यादवची उत्कृष्ट बॅटिंग

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज : रायली रुसो, प्रभसिमरन सिंग, सॅम रन (कप्तान), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment