IPL 2024 MI vs CSK MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. सोबत त्याने एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्याने चेन्नईकडून टी-20 क्रिकेटमध्ये 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 धावा केल्यानंतर हा आकडा पार केला. 5,000 धावा (चॅम्पियन्स लीग टी-20 सह) पूर्ण करणारा तो या फ्रँचायझीचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात धोनी शेवटच्या षटकात फलंदाजीला आला. हार्दिक पांड्याने टाकलेल्या या षटकात धोनीने सलग तीन षटकार खेचले आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा केल्या. यासह त्याने 4 चेंडूत 20 धावांची आतषबाजी खेळी केली.
हेही वाचा – IPL 2024 MI Vs CSK : चेन्नईचे मुंबईला 207 धावांचे तगडे आव्हान; ऋतुराज, दुबेचे फटके; धोनीचा ‘सुपरहिट’ कॅमिओ!
धोनीने 2008 मध्ये चेन्नईमधून आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. या जर्सीवर 250 सामने (चॅम्पियन्स लीग टी-20 सह) खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत सुमारे 39 च्या सरासरीने 5,000 हून अधिक धावा केल्या आहेत. या संघासाठी, त्याने 84* धावांच्या सर्वोच्च धावसंख्येसह 23 अर्धशतकेही केली आहेत. तो 2 (2016 आणि 2017) वगळता सर्व हंगामात चेन्नईकडून खेळला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा