IPL 2024 GT vs MI | आयपीएल 2024 मध्ये आज डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. हार्दिक पांड्या गेल्या दोन मोसमात गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. आयपीएल 2024 च्या लिलावानंतर मुंबईने हार्दिकला ट्रेड केले आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. यानंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिकला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. या गोष्टीमुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आणि सोशल मीडियावर तीव्र विरोध झाला.
मुंबई इंडियन्समध्ये नमन धीर, जेराल्ड कोएत्झी आणि शम्स मुलानीला संधी देण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये अजमतुल्ला ओमरझाई, स्पेन्सर जॉन्सन आणि उमेश यादव पदार्पणाचा सामना खेळत आहेत.
हेही वाचा – Rules Changes From 1st April : ‘हे’ 7 नियम 1 एप्रिलपासून बदलणार! माहीत करून घ्या
दोन्ही संघाची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पीयुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, लूक वूड.
गुजरात टायटन्स – शुभमन गिल (कप्तान), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा