IPL 2024 GT vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा मोदी स्टेडियमवर रांगडा खेळ; गुजरातवर ६ गड्यांनी मात!

WhatsApp Group

IPL 2024 GT vs DC : आपल्या गोलंदाजांच्या स्फोटक कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा त्यांच्याच घरी 6 गडी राखून पराभव केला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 100 धावांचा टप्पा देखील पार करू शकला नाही आणि IPL 2024 च्या सर्वात कमी धावसंख्येवर कोसळला. आयपीएलच्या इतिहासातील गुजरात टायटन्सची ही सर्वात छोटी धावसंख्या आहे. आयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात दिल्लीने गुजरातला 17.3 षटकात 89 धावांत गुंडाळले. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सची किमान धावसंख्या 125 धावा होती. त्यानंतर 2023 मध्ये दिल्लीने गुजरातचा पराभव केला.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्लीने ठराविक अंतराने गुजरातच्या विकेट घेतल्या ज्यामुळे एकेकाळचा चॅम्पियन संघ 100 चा आकडाही पार करू शकला नाही. दिल्लीकडून मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी धारदार गोलंदाजी केली. मुकेशला सर्वाधिक 3 विकेट्स मिळाल्या. तर इशांत आणि स्टब्सने 2-2 विकेट्स घेतल्या. खलील आणि अक्षर पटेल यांना 1-1 विकेट मिळाली. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली.

हेही वाचा – शेतकऱ्याच्या पोराने क्रॅक केली UPSC..! मातीच्या पडक्या घरात मेहनत, आज सेलिब्रेशन! पाहा Video

प्रत्युत्तरात दिल्लीची सुरुवात चांगली झाली. जेक फ्रेझर-मॅकगर्कने झटपट 20 धावा केल्या. अभिषेक पोरेल (15), शाय होप (19) ऋषभ पंतने (नाबाद 16) धावा केल्या. गुजरातच्या या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने आपले चार फलंदाज गमावले. शेवटी नवव्या षटकात दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment