IPL 2023 CSK vs RR : शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 21 धावा हव्या होत्या. महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजाने प्रयत्नांची शर्थ करून 17 धावा काढल्या आणि राजस्थानने ३ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. धोनीने दोन षटकार खेचले आणि शेवटच्या चेंडूवर 5 धावा हव्या असताना संदीप शर्माने 1 धाव दिली. धोनी १७ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ३० तर जडेजा १५ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २५ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईचा कॅप्टन म्हणून धोनीचा हा 200वा सामना होता.
चेपॉकवर रंगलेल्या या सामन्यात धोनीने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. जोस बटलरच्या ५२ धावा (1 चौकार आणि 3 षटकार) देवदत्त पडिक्कलच्या (5 चौकार) 38 धावांच्या जोरावर २० षटकात ८ बाद १७५ धावा करता आल्या. चेन्नईकडून आकाश सिंह, तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने 50 धावा (6 चौकार) केल्या. अजिंक्य रहाणेने 2 चौकार आणि एका षटकारासह 31 धावा केल्या. रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
CSK needs 21 runs from 6 balls, Dhoni on strike:
Wd, Wd, 0, 6, 6, 1, 1, 1
Tough luck, Dhoni, fought hard at the age of 41. pic.twitter.com/zrkYmLGZzD
— Johns. (@CricCrazyJohns) April 12, 2023
Dhoni said "I didn't know it was my 200th game as captain but what matters is how you are performing & results".
What a man, Legend. pic.twitter.com/w4XwzPtcRq
— Johns. (@CricCrazyJohns) April 12, 2023
हेही वाचा – Diabetes : रोज रिकाम्या पोटी ‘हे’ खा, शुगर कंट्रोलमध्ये येईल..! एका क्लिकवर वाचा
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज – डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, सिसांडा मगला, महेश थिक्षना, तुषार देशपांडे, आकाश सिंह.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, अॅडम झम्पा.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!