IPL 2023 : धोनी आयपीएलमधून बाहेर? CSK कोच फ्लेमिंगचा धक्कादायक खुलासा; म्हणाला…

WhatsApp Group

IPL 2023 MS Dhoni Injury : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने (RR) चेन्नई संघाचा 3 धावांनी पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. या पराभवानंतर चेन्नई संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला दुखापत झाली आहे. याचा खुलासा खुद्द चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला आहे. धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे त्याला काही ‘हालचाली’चा त्रास होत आहे, असे फ्लेमिंगने सांगितले.

दुखापतग्रस्त खेळाडूंच्या समस्येने झगडणाऱ्या चेन्नई संघासाठी आणखी एक वाईट बातमी आहे, कारण दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला दुखापतीमुळे दोन आठवड्यांसाठी बाहेर आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्सकडून चेन्नईचा 3 धावांनी पराभव झाल्यानंतर फ्लेमिंगने हा खुलासा केला.

हेही वाचा – Horoscope Today : व्यवसायाच्या दृष्टीने ‘या’ राशीसाठी लाभदायक दिवस..! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

फ्लेमिंग म्हणाला, ”धोनी गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजत आहे, जे तुम्ही त्याच्या काही हालचालींमध्ये पाहू शकता. यामुळे त्याला काहीसा त्रास होत आहे. त्याचा फिटनेस व्यावसायिक खेळाडूसारखाच आहे. तो स्पर्धा सुरू होण्याच्या अनेक महिने आधीच तयारी सुरू करतो. त्याने रांचीमध्ये नेट्समध्ये सराव केला, परंतु सीझनपूर्व तयारी तो चेन्नईला पोहोचण्याच्या एक महिना आधीच सुरू झाला.”

संदीप शर्माने शेवटच्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंमध्ये केवळ 3 धावा देत राजस्थानला विजय मिळवून दिला, त्यावेळी धोनी आणि रवींद्र जडेजा क्रीजवर होते. धोनी दुखापतीतून सावरेल आणि संघाचे नेतृत्व करत राहील, असा विश्वास प्रशिक्षक फ्लेमिंगला आहे. फ्लेमिंग म्हणाला, ”धोनी फॉर्ममध्ये परतण्याच्या मार्गावर काम करतो आणि तो खूप चांगला खेळत असल्याचे तुम्ही पाहू शकता.”

चहर आणि स्टोक्स दुखापतग्रस्त

चेन्नईच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. टाचेच्या दुखापतीमुळे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा सामना खेळू शकला नाही, तर भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहर हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे IPL 2023 मधून जवळपास बाहेर पडला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment