‘आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण’ पुरस्कार : शिक्षिका आसावरी कदम यांचा काठमांडू येथे गौरव!

WhatsApp Group

International Hindi Bhasha Bhushan Award : देवगड तालुक्यातील मोंड येथील शां. वि. कुळकर्णी विद्यामंदिर, हिंदी विषयाच्या शिक्षिका आणि प्रभारी मुख्याध्यापिका आसावरी सुनिल कदम यांना ‘आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विश्वस्तरिय हिंदी भाषा विकास, प्रचार, संवर्धन आणि अनुसंधान कार्यात आसावरी कदम यांनी मोलाचे योगदान दिले. १ ऑक्टोबर रोजी काठमांडू-नेपाळ येथे संपन्न झालेल्या नेपाळ-भारत हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनाच्या भव्य कार्यक्रमात कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय समितीकडून कदम यांची निवड

या मोठ्या पुरस्कारासाठी आसावरी कदम यांची निवड ‘हिंदी शिक्षक तथा साहित्यिक संमेलनाचे’ संयोजक डॉ. कैलास जाधव, भारत सरकार व स्वागताध्यक्ष संगिता ठाकूर, काठमांडू नेपाळ तसेच केंद्रीय समन्वयक उस्मान मुलाणी यांच्या केंद्रीय समितीने केली आहे. मोंड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आसावरी कदम यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा – Video : …आणि संभाजी भिडेंच्या पाया पडल्या सुधा मूर्ती! ‘ती’ भेट ठरतेय चर्चेचा विषय

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment