Rajat Dalal Driving Recklessly Video : आपल्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रजत दलालचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की या व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस रजत दलाल असून जो पूर्णपणे व्यस्त रस्त्यावर 140+ किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत आहे.
ओव्हरस्पीड करत असताना त्याने एका बाईकला धडक दिली आणि थांबण्याची तसदीही घेतली नाही. त्याच्या शेजारी सीटवर एक महिला देखील बसलेली आहे, जी कथित रजत दलालला हळू चालवण्यास सांगते, ज्याच्या उत्तरात तो ”कोई बात नही” असे म्हणतो.
जेव्हा कथित रजत दलालने बाईकला धडक दिली तेव्हा बाजुला बसलेली महिला घाबरली. ती व्हिडिओमध्ये म्हणते, ”सर वो गिर गया”. यावर रजत दलाल म्हणतो, ‘कोई बात नही, रोजका काम है ये मेरा”. कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे.
Rajat Dalal , के साथ एक लड़की बैठी हुई है , जब इसकी गाड़ी से किसी को ठोकर लगता है , तो वो लड़की बोलती है , सर वो गिर गया , लेकिन ये रजत दलाल बोलता है , मेरा रोज का यही काम है , आप आराम से बैठे रहो।
— Gautam Yadav (@gautamBhartiye) August 30, 2024
इसको इतनी खुली छुट किसने दी, दूसरो की जान की कोई कीमत नहीं है ।#RajatDalal… pic.twitter.com/rrNpUSxwb5
हेही वाचा – राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रजत दलालाचा हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याच्या अटकेची मागणी करत आहेत. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे देखील स्पष्ट झालेले नाही. लोक व्हिडिओ पोस्ट करून आणि दिल्ली, फरिदाबाद आणि गुरुग्राम पोलिसांना टॅग करून रजत दलालला अटक करण्याची मागणी करत आहेत.
रजत दलाल याला यापूर्वीच एका मुलासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या वर्षी जूनमध्ये अहमदाबाद पोलिसांनी रजतला 18 वर्षीय मुलावर हल्ला करणे, त्याच्याशी गैरवर्तन करणे, त्याचे अपहरण करणे, त्याच्या चेहऱ्यावर शेण मारणे आणि त्याच्यावर लघवी करणे यासाठी अटक केली होती.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!