IndiGo कडून ग्राहकांना खुशखबर! विमान तिकीटात होणार कपात

WhatsApp Group

नवीन वर्षाच्या सुरुवातीला विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही इंडिगो (IndiGo) फ्लाइटने प्रवास करत असाल, तर आता तुम्हाला तिकिटासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. विमान कंपन्यांनी गुरुवारी इंधन शुल्क हटवण्याची घोषणा केली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या मते, हा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्ग 4 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे.

इंडिगो ही भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील एक प्रमुख आणि देशातील सर्वात मोठा बाजार हिस्सा असलेली एअरलाइन कंपनी आहे, इंडिगो एअरलाइन्सला इंधन अधिभार काढून टाकण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा अधिभार आजपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर लागू झाला आहे. एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे, एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.

एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाल्यानंतर, इंडिगोने गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन अधिभार लागू केला होता. जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला होता. एअरलाइन्सच्या प्रवाशांना प्रवासाच्या अंतरानुसार हा इंधन अधिभार भरावा लागत होता, परंतु आता त्यांची या शुल्कातून सुटका झाली आहे आणि ते काढून टाकल्यानंतर इंडिगो फ्लाइटने प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट स्वस्त होऊ शकते.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन अधिभार लागू करताना, इंडिगोने सांगितले होते, की विमान प्रवासाच्या अंतरानुसार फ्यूज चार्ज 300 ते 1,000 रुपये निश्चित करण्यात आला आहे. एटीएफ किमतींचा थेट परिणाम भाड्यांवर दिसून येतो. खरेतर, कोणत्याही विमान कंपनीच्या परिचालन खर्चापैकी सुमारे 40 टक्के एटीएफचा वाटा असतो.

हेही वाचा – श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत मिळणार टाटाच्या इलेक्ट्रिक कार! भाडे किती? बुक कशी करायची? वाचा!

1 जानेवारीला 2024 रोजी तेल विपणन कंपन्यांनी एटीएफच्या किमती कमी केल्या होत्या. IOCL च्या वेबसाइटनुसार, राजधानी दिल्लीत एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) 4% ने कमी करण्यात आले आहे, त्यानंतर ATF ची किंमत प्रति किलोलिटर 4,162.50 रुपयांनी कमी होऊन 1,01,993.17 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. नोव्हेंबर 2023 पासून तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या किमतीत केलेली ही सलग तिसरी कपात होती.

ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या एटीएफच्या किमती कमी करण्याच्या निर्णयाचा दिलासादायक परिणाम आता दिसू लागला आहे आणि इंडिगो एअरलाइन्सने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. या तीन महिन्यांत कंपन्यांनी केलेल्या कपातीमुळे विमान इंधनाच्या किमतीत प्रति किलोलिटर 16206 रुपयांची घट झाली आहे. कोलकातामध्ये 1,10,962.83 रुपये प्रति किलोलीटर, मुंबईमध्ये 95,372.43 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,06,042.99 रुपये प्रति किलोलीटर झाले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment