ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय चित्रपटातील बालकलाकाराचं निधन!

WhatsApp Group

Chhello Show Child Artist Rahu Koli Dies : यावर्षी ऑस्करमध्ये दाखल झालेला गुजराती चित्रपट ‘छेलो शो’चा बालकलाकार राहुल कोली यांचे निधन झाले आहे. राहुलच्या आजाराबाबत आजपर्यंत अचूक माहिती समोर आलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल कोलीचा मृत्यू ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरमुळे अहमदाबादमध्ये झाला. राहुलच्या मृत्यूची बातमी कळताच सर्वजण दु:खी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा असलेल्या राहुलचे वडील रिक्षा चालवतात. ‘छेलो शो’ हा चित्रपट ऑस्कर २०२३ च्या शर्यतीत उतरणारा देशातील पहिला चित्रपट आहे.

राहुलच्या वडिलांनी सांगितले, की राहुलला २ ऑक्टोबरला ताप आला होता, त्याने कुटुंबासोबत नाश्ता केला होता आणि त्यानंतर काही तासांनी राहुलला तीन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यानंतर राहुलचा मृत्यू झाला. राहुलच्या वडिलांनी म्हटले, की तो खूप आनंदी होता आणि अनेकदा म्हणायचा की १४ ऑक्टोबरनंतर (चित्रपटाची रिलीज तारीख) आमचे आयुष्य बदलेल. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राहुलने जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा – बीड हादरलं..! भाजप शहराध्यक्षानं डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं; कारण…

‘छेलो शो’ ऑस्करच्या शर्यतीत

‘छेलो शो’ या गुजराती नाटकाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी केले आहे. या चित्रपटात भाविन रबारी, भावेश श्रीमाळी, ऋचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १० जून २०२१ रोजी ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला. चित्रपटाची कथा गुजरातमधील सौराष्ट्रातील चलाला या गावात राहणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलाभोवती फिरते, ज्याला सिनेमा पाहायला आवडते. जेव्हा हा मुलगा पहिल्यांदा थिएटरमध्ये चित्रपट पाहतो, तेव्हापासून त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते.

Leave a comment